इंडियन मेडिकल असोसिएशन बारामतीचा संघटनेच्या राज्य कार्यकारिणीत गौरव
बारामती शाखेच्या द्रुष्टीने हि अभिमानास्पद व उत्साहवर्धक बाब
इंडियन मेडिकल असोसिएशन बारामतीचा संघटनेच्या राज्य कार्यकारिणीत गौरव
बारामती शाखेच्या द्रुष्टीने हि अभिमानास्पद व उत्साहवर्धक बाब
बारामती वार्तापत्र
इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखेच्या नूतन कार्यकारिणीच्या निवडणूक संबंधीत बैठक नुकतीच मुंबई येथे पार पडली. सदरील बैठकीत संघटनेच्या नुतन राज्यकार्यकारीणीची निवड व घोषणा करण्यात आली. यामध्ये संघटनेच्या बारामती शाखेच्या तीन सदस्यांना बिनविरोध घोषित करण्यात आले. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे जेष्ठ सदस्य व माजी अध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांचे बारामती शाखेला महत्वपूर्ण मार्गदर्शन असल्यामुळेच हे साध्य होऊ शकले. डॉ.अविनाश आटोळे (स्त्री रोग तज्ञ) यांची महाराष्ट्र राज्य शाखेचे उपाध्यक्ष म्हणून तर डॉ. महेंद्र दोशी व डॉ. अमरसिंह पवार यांची केंद्रीय कमिटी सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
आय.एम. ए. बारामती शाखेच्या द्रुष्टीने हि अभिमानास्पद व उत्साहवर्धक बाब असल्याचे सचिन डॉ. संतोष घालमे यांनी यांनी सांगितले.
मुंबई येथे महाराष्ट्र आय.एम.ए.शाखेच्या परिषदेच्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयांवर व प्रश्नांवर चर्चा केली गेली.
त्यामध्ये अहमदनगर येथील दुर्दैवी घटनेत प्रशिक्षणार्थी डॉक्टर व नर्सेसवर जी अन्यायकारक कारवाई केली गेली त्याचा एकमुखाने निषेध करण्यात आला. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत वैद्यकीय विद्यार्थ्यांना पाठबळ देऊन मानसिक खच्चीकरण होऊ न देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात असे ठरवले गेले.
बारामती आय एम ए संघटनेच्या अध्यक्षा डॉ. विभावरी सोळुंके,सहसचिव डॉ. दिपीका कोकणे, खजिनदार डॉ. सौरभ मुथा, माजी अध्यक्ष डॉ. संजय पुरंदरे,उपाध्यक्ष डॉ. बापूसाहेब भोई,डॉ. सचिन घोळवे, व विविध सदस्यांनी वरील परिषदेत सहभाग नोंदवला.