आपला जिल्हा

इंदापुरमधील समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी 

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे व्यापारी व नागरिकांची गैरसोय 

इंदापुरमधील समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी 

– रस्त्याच्या दुरावस्थेमुळे व्यापारी व नागरिकांची गैरसोय

इंदापूर, आदित्य बोराटे –

इंदापूरातील विविध रस्ते अत्यंत खराब झाले असून, नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यासह अनेक भागातील पथदिवे बंद आहेत. याबाबत तत्काळ रस्ते दुरुस्ती करावी, तसेच पथदिवे सुरू करण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने इंदापूर नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

मे महिन्यात, तसेच मागील महिन्यात इंदापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे इंदापूर नगरपरिषद हद्दीमधील बाबा चौक ते हिंदू स्मशानभूमी, डॉ. हेगडे हॉस्पिटल ते इंद्रेश्वर मंदिर, नेहरू चौक ते डॉ. आंबेडकर चौक, यासह इंदापूर शहराच्या मध्यवर्ती रहदारीच्या ठिकाणांवरील रस्त्याच्या मधोमध ड्रेनेज पाइप लाईन केल्याने त्या रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या दिवाळी सारखा सण काही दिवसावर आलेला असताना इंदापूर तालुका व परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी इंदापूरच्या बाजारपेठेमध्ये होत आहे. या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे व्यापारी व नागरिक यांची गैरसोय होत आहे.

याबाबतचे निवेदन आरपीआयचे जिल्हा संघटक सचिव शिवाजीराव मखरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे यांनी मुख्याधिकारी रमेश ढगे यांना दिले.

Back to top button