इंदापुरमध्ये तालुक्यात काल ४२ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
हा जनता कर्फ्यूचा परिणाम आहे.
इंदापुरमध्ये तालुक्यात काल ४२ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
हा जनता कर्फ्यूचा परिणाम आहे.
इंदापूर : बारामती वार्तापत्र
काल इंदापूर मध्ये तपासलेल्या नमुन्यांमधून तालुक्यातील ४२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
काल तपासलेल्या नमुन्यांमधील आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वालचंदनगर येथील ६० वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, ३८ वर्षीय महिला, २१ वर्षीय युवक, १२ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
काटी येथील एका कुटुंबातील सहा जणांसह गावात सात जण आढळून आले आहेत. त्यामध्ये ६५ वर्षीय पुरूष, ५० वर्षीय महिला, ३० वर्षीय महिला, १० वर्षीय मुलगी, ९ वर्षीय मुलगा, १६ वर्षीय युवती, ५६ वर्षीय पुरूष, अकोले येथील ३८ वर्षीय महिला, १७ वर्षीय मुलगी, ५ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
सपकळवाडी येथील ४५ वर्षीय पुरूष, ३६ वर्षीय पुरूष, लोणीदेवकर येथील ७८ वर्षीय महिला, २८ वर्षीय पुरूष, भोडणी येथील ६० वर्षीय महिला, इंदापूर शहरातील ६० वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरूष, १२ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
जाधववाडी येथील ५ वर्षीय मुलगा, ४५ वर्षीय महिला, ८० वर्षीय महिला, २१ वर्षीय युवक, १९ वर्षीय युवक, २१ वर्षीय युवती, २५ वर्षीय महिला, ८ वर्षीय मुलगा, ५ वर्षीय मुलगी, २७ वर्षीय पुरूष, रणगाव येथील २६ वर्षीय पुरूष, लासुर्णे येथील ६८ वर्षीय पुरूष, बोरी येथील ५० वर्षीय महिला, पवारवाडी येथील ३० वर्षीय महिला, बिजवडी येथील ७० वर्षीय महिला, काटी येथील ३० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.