इंदापुरातील राजेवलीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन
इंदापुरातील राजेवलीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरातील राजेवलीनगर येथे अरबाज शेख मित्र परिवाराकडून छञपती शिवाजी महाराज जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.व सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच एक ऊर्जा आहे.रयतेच्या कल्याणासाठी महाराजांनी स्वराज्य उभे केले.जात, धर्म, पंथ न मानता त्यांनी सर्वांना न्याय देऊन समता व बंधुत्व प्रस्थापित केले.त्यामुळे आपल्या सर्व शिवप्रेमींसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव ,इंदापूर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,श्रीराज भरणे, नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे,नगरसेवक तथा आरोग्य सभापती अनिकेत वाघ,नगरसेवक अमर गाडे,मा.नगरसेवक हरिदास हराळे,डॉ.मंगेश पाटील,डॉ.बिचकूले,
इत्यादी मान्यवर उपस्थित होते.शालेय विद्यार्थी श्रीरत्न माने,आर्यान कांबळे,काव्या चव्हाण,प्रियदर्शनी शिंदे व इतर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडा व भाषणं सादर केली.
शिवरायांमुळे समाजात एकता आणि एकात्मता अबाधित आहे हाच संदेश देण्यासाठी शिवजन्मोत्सव एकत्र येऊन साजरा करत असल्याचे मत कार्यक्रमाचे आयोजक अरबाज शेख यांनी व्यक्त केले.