इंदापुरातील ‘सायकल बँक’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते १११ सायकलींचे लोकार्पण: विद्यार्थ्यांची सायकल फेरी लक्षवेधी

इंदापुरातील ‘सायकल बँक’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते १११ सायकलींचे लोकार्पण: विद्यार्थ्यांची सायकल फेरी लक्षवेधी
इंदापूर;प्रतिनिधि
‘सायकलचा आधार, भविष्याला आकार’ या पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून प्रेरित होऊन, इंदापूर पंचायत समितीने ‘सायकल बैंक’ उपक्रमास प्रतिसाद देत १११ सायकलींचे लोकार्पण कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
इंदापुरातील पंचायत समिती येथे आयोजित कार्यक्रमासंगी कृषिमंत्री भरणे यांच्यासह पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय जगताप, पंचायत समिती बांधकाम विभाग उपअभियंता शिवाजी राऊत, पाणीपुरवठा उपअभियंता प्रशांत गावंडे, तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत मुलींच्या शिक्षणासाठी हा एक अत्यंत स्तुत्य उखाम असून मुलींची गैरसोय टळेल आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच तालुक्यातील पदाधिकारी प्रतिष्ठीत नागरिक व इतर शासकीय विभागांनीही अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श निर्माण करावा असे आवाहन केले.
यावेळी प्रस्ताविकामध्ये गटविकास अधिकारी सबिन खुड़े म्हणाले की, मुलींचा प्रवास सुकर होणे, शालेय उपस्थितीत वाढ होणे, आत्मविश्वास वाढवणे, समाजाच्या विकासासाठी आधार व मुलींची शिक्षणातीत गळती कमी करणे हा उद्देश आहे.
ग्रामीण भागातील ज्या मुलींना शाळेत जाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते, अशा पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनीना या सायकल बैंक उपक्रमांतर्गत सायकलीचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे शेवटी कृषिमंत्री भरणे यांच्यासह सर्व अधिकारी व विद्यार्थिनी यांनी शहरातून काढलेली सायकल फेरी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
इंदापूर पंचायत समितीच्या विभागांचा सहभाग
या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी पंचायत समिती इंदापूरच्या विविध विभागांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यामध्ये ग्रामपंचायत विभागाकडून ७२, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून १०, शिक्षण
विभागाकडून ५, पंचायत विभागाकडून ७, आरोग्य विभागाकडून ५,प्रशासन विभागाकडून ५, आणि उमेद टीमकडून ५ सायकली आणि समाजकल्याण विभागातर्फे वैभव नाळे यांनी २ सायकली भेट दिल्या.