मोठी बातमी: मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा कोर्टाचं अटक वॉरंट जारी; पोलीस काय भूमिका घेणार?

शिराळा कोर्टातून एका जुन्या प्रकरणात राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले.

मोठी बातमी: मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा कोर्टाचं अटक वॉरंट जारी; पोलीस काय भूमिका घेणार?

शिराळा कोर्टातून एका जुन्या प्रकरणात राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले.

मुंबई :प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मशिदीवरील भोंग्यांबाबत घेत असलेल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अशातच सांगलीतील शिराळा कोर्टाकडून राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. एका जुन्या प्रकरणात हे वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती आहे. ६ एप्रिल रोजी हे वॉरंट जारी करूनही अद्याप राज यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही कोर्टाने पोलिसांना विचारल्याचं सांगितलं जात आहे.

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी पोलीस प्रशासनाला ४ मे रोजीचा अल्टिमेटम दिल्याने वातावरण तापलं आहे. या प्रकरणी राज यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाविकास आघाडीतील काही नेत्यांसह सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यातच शिराळा कोर्टातून एका जुन्या प्रकरणात राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले असल्याचं वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिलं आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांच्याविरोधात बीडमधील परळी न्यायालयानेही अटक वॉरंट जारी केले होते. २००८ साली राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल होऊन हे प्रकरण न्यायालयात गेले होते. यानंतर राज ठाकरे यांना अनेकदा न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु, राज ठाकरे एकाही सुनावणीला हजर राहिले नव्हते. जामीन देऊनही सतत तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!