आपला जिल्हा

इंदापुरात पोलीस निरीक्षकाविरोधात आंदोलन

बेमुदत धरणे आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस  

इंदापुरात पोलीस निरीक्षकाविरोधात आंदोलन

बेमुदत धरणे आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस

इंदापूर, आदित्य बोराटे –

इंदापुरातील पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका,जुगार,वाळू उपसा, गुटखा विक्री असे विविध बेकायदा धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.तसेच सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना सेवेतून तात्काळ निलंबित करण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व संघटनांच्या वतीने सोमवार ( दि.22) सप्टेंबर रोजी पासून प्रशासकीय भवनासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राज्याचे सरचिटणीस ॲड. राहुल मखरे,ॲड.बापूसाहेब साबळे, रिपाईचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे,भटके विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष तानाजी धोत्रे,फुले, शाहु आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष हनुमंत कांबळे, भिमशक्ती सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शरद चितारे, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते अनिल कांबळे,सूरज धाईंजेलहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय जगताप,ॲड.समीर मखरे, संजय कांबळे आदी उपस्थित होते.

      इंदापूर पोलिस ठाण्याच्या माध्यमातून अवैध धंद्यावर पोलिस प्रशासनाकडून सतत कारवाई करण्यात येत असते. याबाबतची माहिती आंदोलनकर्त्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही, तसेच तक्रार आल्यानंतरच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तपासाअंती त्याबाबतचा अहवाल न्यायालयात दाखल केला आहे.

सूर्यकांत कोकणे, पोलिस निरीक्षक, इंदापूर

Back to top button