आपला जिल्हा

इंदापुरात शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप 

सामाजिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रेरणा

इंदापुरात शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप 

सामाजिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रेरणा

आदित्य बोराटे – 

इंदापूरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या तिन्ही मुले डॉक्टर बनल्याचा अभिमान व्यक्त करीत मोहन भोसले यांनी शाळेबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. तसेच, सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी शाळेतील गरजूंना दप्तरांचे वाटप केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 येथे आयोजित कार्यक्रमात मोहन भोसले, डॉ. वैभव भोसले, आशा मोहन भोसले यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप झाले. या वेळी बोलताना मोहन भोसले म्हणाले, “माझ्या तिन्ही मुलांचे प्राथमिक शिक्षण या जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. आज ही तिन्ही मुले डॉक्टर झाली आहेत. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी कुठेही कमी पडत नाहीत. योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाले तर या शाळेतील विद्यार्थीही मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकतात.”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी सभापती व विद्यमान संचालक दत्तात्रय ठोंबरे यांनी केले. त्यांनी जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकत अशा सामाजिक उपक्रमांमुत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका मंदाकिनी बोराटे, पुष् दळवी, वैशाली वर्तले उपस्थित होत्या.रुकसाना शेख यांनी सूत्रसंचालन केले तर भारती पोळकर यांनी आभार मानले.

Back to top button