इंदापुर येथे आजपासून पाच दिवस कृषी महोत्सव
आदर्श शेतकरी, व्यापारी यांचा सन्मान

इंदापुर येथे आजपासून पाच दिवस कृषी महोत्सव
आदर्श शेतकरी, व्यापारी यांचा सन्मान
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आयोजित ‘इंदापूर कृषी महोत्सव 2025’ चे उद्घाटन बुधवारी (दि.22) जानेवारी रोजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते व क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. हे प्रदर्शन 26 जानेवारीपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. कृषी प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण 26 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, क्रीडामंत्री भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या प्रदर्शनात कृषी, पशुपक्षी, जनावरे प्रदर्शन व डॉग शो, तसेच पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडे बाजाराचे आयोजन केले आहे. कृषी प्रदर्शनास प्रवेश विनामूल्य आहे, अशी माहिती बाजार समितीचे मार्गदर्शक व जिल्हाबँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, बाजार समितीचे सभापती तुषार जाधव व उपसभापती मनोहर ढुके यांनी दिली. यावेळी बाजार समितीचे संचालक व माजी आमदार यशवंत माने, विलास माने, दत्तात्रेय फडतरे, मधुकर भरणे, रोहित मोहोळकर, अनिल बागल, आबा देवकाते, संग्रामसिंह निंबाळकर, रुपालीताई संतोष वाबळे, मंगलताई गणेशकुमार झगडे, दशरथ पोळ, संतोष गायकवाड, संदीप पाटील, रोनक बोरा, सुभाष दिवसे, प्रभारी सचिव संतोष देवकर, अजय वाबळे आदी उपस्थित होते.
आदर्श शेतकरी, व्यापारी यांचा सन्मान
■ शेतकरी बांधव दुष्काळी परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती यावर मात करून ऊस शेती, फळबाग, भाजीपाला, भुसार वगैरे उत्पादने घेतात. त्यांच्या शेतीविषयक लागवड व उत्पादनास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळून त्यांचे शेती व शेतीपूरक व्यवसाय उत्पादनात वाढ व्हावी, या उद्देशाने बाजार समितीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शेतमाल उत्पादनातील अग्रेसर प्रगतशील शेतकरी व नियमित शेतमाल खरेदी- विक्रीचे उत्कृष्ट व उच्चांकी कामकाज करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता त्यांचा सत्कार केला जाणार आहे.