इंदापुर येथे दहीहंड़ी मार्गदर्शन सभा संपन्न
गोविंदा पथकांना पुर्व सरावासाठी शास्त्रोक्त प्रशिक्षणासाठी मोफत ट्रेनर

इंदापुर येथे दहीहंड़ी मार्गदर्शन सभा संपन्न
गोविंदा पथकांना पुर्व सरावासाठी शास्त्रोक्त प्रशिक्षणासाठी मोफत ट्रेनर
इंदापूर प्रतिनिधी –
महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन यांच्या वतीने इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात दहीहंडी मार्गदर्शन सभा शुक्रवारी (दि.२१) संपन्न झाली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे पदाधिकारी बाळा (श्रीकृष्ण) पडेलकर, गीताताई झगडे, डेव्हिड फर्नांडिस, विवेक नाकती, सचिन खेतले, राजेश सोनवडेकर आदी मान्यवरांनी उपस्थित गोविंदा पथकांना मार्गदर्शन केले.
दहीहंडी उत्सवपुर्वी दहीहंडी पथकातील गोविंदा यांचा अपघाती विमा, प्रो-गोविंदा, स्पेन टूर (कॅस्टलर्स ऑफ विला फ्रेंका), दहीहंडी आयोजक यांचे कडून गोविंदा पथक यांना दिले जाणारे बक्षीस आणि उपस्थित गोविंदा पथकांना दिले जाणारे मानधन, महिला दहीहंडी पथक निर्मिती आदीविषयावर चर्चा झाली. यावेळी दहीहंडी काळात गोविंदा पथकांना पुर्व सरावासाठी शास्त्रोक्त प्रशिक्षणासाठी मोफत ट्रेनर उपलब्ध करून देणार असल्याचे महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन यांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी गोविंदा पथक सदस्यांच्या नवनवीन कल्पना व योग्य सुचना यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी इंदापूर तालुका आणि शहर परिसरातील, स्वराज्य दहीहंडी पथक, तिरंगा दहीहंडी पथक, शिवशंभो दहीहंडी पथक, इंद्रेश्वर दहीहंडी पथक, संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी पथक, व्यंकटेश दहीहंडी पथक, छत्रपती शिवाजी महाराज दहीहंडी पथक, महात्मा फुले ग्रुप, दहीहंडी पथक यांचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, रमेश शिंदे यांनी केले. आभार अक्षय सुर्यवंशी यांनी मानले.