इंदापुर येथे बौद्ध बांधवांचा शांती मोर्चा
महाबोधी विहाराचे ट्रस्टी हटवा

इंदापुर येथे बौद्ध बांधवांचा शांती मोर्चा
महाबोधी विहाराचे ट्रस्टी हटवा
इंदापूर प्रतिनिधी –
बुद्धगया टेंपल अॅक्ट 1949 रद्द करून महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे. या मागणीसाठी सोमवारी (दि. 17) मार्च रोजी बौद्ध बांधवांकडून इंदापूर नगरपरिषदे पासून प्रशासकीय भवनापर्यंत शांततेत मोर्चा काढण्यात आला.
चला एक साथ, एक पाऊल धम्म पथावर, बौद्धगयाचे नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात द्या. महाबोधी विहाराचे ट्रस्टी हटवा. अशा स्वरूपाचे मजकूर असणारे विविध फलक घेऊन या मोर्चात बौद्ध भंते, समता सैनिक दलाचे जवान, महिला आणि बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, बिहार सरकारचा बौद्धगया महाबोधिविहार व्यवस्थापन कायदा रद्द करा. महाबोधीमहाविहार हे संपूर्णतः बौद्धांच्या ताब्यात द्यावे. महाबोधी महावीरातील ब्राह्मण प्रशासन हटवा. अशा मागण्या असणारे निवेदन तहसीलदार जीवन बनसोडे यांना देण्यात आले. यावेळी अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.