इंदापूर

इंदापुर येथे विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासिकेची सुरुवात

गोविंद पाडुळे यांचा सन्मान

इंदापुर येथे विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासिकेची सुरुवात

गोविंद पाडुळे यांचा सन्मान

इंदापूर; प्रतिनिधी

“विद्यार्थ्यांना वाचन, अभ्यास व स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी या हेतूने इंदापूर शहर दिपू सुलतान यंग सर्कल यांच्यावतीने सुरु केलेली फातिमा शेख अभ्यासिका विद्यार्थी व तरुणांसाठी फायद्याची ठरेल, असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी केले.

शहरातील दर्गाह मशीद चौक येथे, टिपू सुलतान यंग सर्कल संचलित फातिमा शेख अभ्यासिकेचा प्रारंभ भरत शहा यांच्या अध्यक्षतेखाली दर्गाह मशीद अध्यक्ष असदखान जमादार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी अनिस डिफेन्स करिअर इनिटट्यूटचे व्यवस्थापक अविनाश निकाळजे, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, अॅड. आशुतोष भोसले,शकील सय्यद,नूतन पाडूळे,बबलू पठाण,अजिंक्य जावीर, अय्याज शेख,यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी दर्गाह मशिदीचे इमाम मौलाना अब्दुल करीम मुशहिदी, जाकीरभाई काझी,अबुल पठाण, नवाज बागवान, जब्बार मोमीन,अॅड. इनायतअली काझी आझाद पटेल,आरशाद सय्यद, आरिफ पठाण, शकील बागवान, समज सय्यद, इब्राहिम शेख,लियाकत पठाण मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्तार मुलानी, अमजद मोमीन, डॉ. रियाज पठाण, अँड. आसिफ बागवान, हमीद आतार, जमीनल मोमीन, कदीर बेपारी , प्रशांत उंबरे, सिकंदर बागवान, गणेश पवार, शकील बागवान, नासिर शेख, अमजद बागवान आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीर शेख, जावीद शिकलकर, झहीर मोमीन, सुलेमान शेख, अलीम मणियार, मीना शेख, वाहिद पठाण, जावेद शेख, सद्दाम सय्यद, साहेब काळजी, अँड. अमन जमादार, रिजवान मोमीन, जय सय्यद, अँड. अरबाज काझी यांनी प्रयत्न केले. अँड भोसले यांनी प्रस्ताविक तर टिपू सुलतान यंग सर्कलचे अध्यक्ष फिरोजखान पठाण यांनी आभार मानले.

गोविंद पाडुळे यांचा सन्मान

इंदापूरचे सुपुत्र व नुकतीच पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेले गोविंग पाडुळे यांचा सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल वतीने करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे बाजी अध्यक्ष बंटी सोनवणे यांनी अभ्यासिकेस पुस्तक संच भेट दिला.

Related Articles

Back to top button