इंदापूरकरांना काहीसा दिलासा…,
त्या दोन महिलांच्या संपर्कातील सर्व (19) जणांचा अहवाल निगेटिव्ह...
इंदापूरकरांना काहीसा दिलासा…
त्या दोन महिलांच्या संपर्कातील सर्व (19) जणांचा अहवाल निगेटिव्ह…
इंदापूर शहरात गेल्या दोन दिवसापूर्वी कोरोना ने कहरच केला होता कोरोनाची वाढती संख्या मुळे इंदापूरकर चिंतेत होते, एकाच कुटुंबातील नऊ जणांना कोरोना लागण झाल्याने व दुसऱ्या दिवशी दोन महिलांना कोरोनाची ची लागण झाल्याने इंदापूरकर चिंतेत पडले होते मात्र असे असले तरी त्या दोन महिलांच्या संपर्कातील 19 जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने इंदापूर कराना काहीसा दिलासा मिळाला आहे,
बायपास परिसरातील महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या महिलेच्या संपर्कातील अकरा जणांच्या घशातील स्वॅब घेतले होते, तसेच सातपुते वस्ती येथील कोरोनाग्रस्त ग्रस्त महिलेच्या संपर्कात आलेल्या आठ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते, या सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.. त्यामुळे इंदापुकरांना थोडासा दिलासा मिळालेला आहे..