
इंदापूर तालुक्यात आज ५८ जण कोरोनाबाधित; दोघांचा मृत्यू
सणसर येथील दोघांचा मृत्यू.
इंदापूर : बारामती वार्तापत्र
आज इंदापूर तालुक्यात संध्याकाळपर्यंत आलेल्या १५२ नमुन्यांपैकी तब्बल ५८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. इंदापूर तालुक्यातील सणसर येथील दोघांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आज शासकीय तपासणीत इंदापूर तालुक्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये डाळज येथील ८० वर्षीय पुरूष, ७० वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरूष, २१ वर्षीय पुरूष, रेडणी येथील ४५ वर्षीय पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
भोडणी येथील ७२ वर्षीय पुरूष, ५० वर्षीय रपुरूष, बावडा येथील ३७ वर्षीय पुरूष, ४२ वर्षीय महिला, लाखेवाडी येथील ४५ वर्षीय पुरूष, ३७ वर्षीय पुरूष, गोंदी येथील २५ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
वरकुटे बुद्रुक येथील ३८ वर्षीय पुरूष, कळंब येथील ४७ वर्षीय महिला, ५३ वर्षीय पुरूष, भिगवण येथील ४४ वर्षीय पुरूष, कसबा इंदापूर येथील ३८ वर्षीय पुरूष, इंदापूर येथील २९ वर्षीय पुरूष, २२ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
बिजवडी येथील ३१ वर्षीय पुरूष, २२ वर्षीय महिला, १३ वर्षीय मुलगी, अंथुर्णे येथील ५८ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय महिला, लुमेवाडी येथील ४० वर्षीय पुरूष, ७० वर्षीय पुरूष, सणसर येथील ५५ वर्षीय महिला, व्याहाळी येथील ३० वर्षीय पुरूष, पळसदेव,काळेवाडी येथील ३६ वर्षीय महिला, १४ वर्षीय मुलगी, १४ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बेलवाडी येथील ३९ वर्षीय पुरूष, ३६ वर्षीय महिला, लासुर्णे येथील ६२ वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील १२ वर्षीय मुलगी, ३९ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
आज इंदापूरमधील राधिकानगर येथील ३८ वर्षीय महिला, ४४ वर्षीय पुरूष, ४७ वर्षीय पुरूष, ४२ वर्षीय महिला, १७ वर्षीय मुलगा, ७२ वर्षीय महिला, १२ वर्षीय मुलगा, ७५ वर्षीय पुरूष, १५ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
बारामतीतील खासगी प्रयोगशाळेत तपासलेल्या इंदापूर तालुक्यातील १० रुग्णांचा आज समावेश आहे. यामध्ये सकाळी तीन जण आढळून आले होते. यामध्ये सणसर, अकोले येथील रुग्ण आढळून आले होते. संध्याकाळच्या अहवालात घोलपवाडी येथील ३८ वर्षीय पुरूष, पिंपळे येथील ६५ वर्षीय पुरूष, बंडगरवाडी-पोंदवडी येथील ४५ वर्षीय पुरूष, टण्णू येथील ३५ वर्षीय पुरूष, लासुर्णे येथील २६ वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील ३४ वर्षीय पुरूष, भाटनिमगाव येथील ४० वर्षीय पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
सणसर येथील दोघांचा मृत्यू
सणसर येथील इंदापूर बाजार समितीत काम करीत असलेल्या एकाचा बारामतीतील उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर भवानीनगर येथील व्यावसायिक व शेतकऱ्याचा बारामतीतील खासगी दवाखान्यात उपचार घेत असताना मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन मृत्यू गावात झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.