इंदापूरच्या इंद्रेश्वर मॅरेथॉनमध्ये भरणे–पाटील एकत्र… झुंबा डान्सने वेधले लक्ष..
इंद्रेश्वर मॅरेथॉनमध्ये भरणे–पाटील एकत्र, झुंबा डान्सने वेधले लक्ष...

इंदापूरच्या इंद्रेश्वर मॅरेथॉनमध्ये भरणे–पाटील एकत्र… झुंबा डान्सने वेधले लक्ष..
इंद्रेश्वर मॅरेथॉनमध्ये भरणे–पाटील एकत्र, झुंबा डान्सने वेधले लक्ष…
बारामती वार्तापत्र
इंदापूर शहरात आयोजित इंद्रेश्वर मॅरेथॉन स्पर्धेत आज राजकीयदृष्ट्या वेगळ्या विचारसरणीचे मानले जाणारे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकत्र दिसून आले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एकत्र आले आहेत, त्यातच आत्ता क्रीडा आणि सामाजिक उपक्रमाच्या निमित्ताने दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिले.
इंद्रेश्वर मॅरेथॉन स्पर्धेच्या ठिकाणी नागरिकांच्या मोठ्या गर्दीत दोन्ही नेत्यांनी झुंबा डान्स करत क्षणभर राजकारण बाजूला ठेवून सहभागींसोबत आनंद साजरा केला.
यावेळी मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनीही नेत्यांसोबत झुंबा डान्समध्ये सहभाग घेतला.
राजकीय दृष्टिकोन वेगळा असला तरी सामाजिक उपक्रमात एकत्र आलेल्या या दोन्ही नेत्यांचा झुंबा डान्स इंदापूरकरांच्या विशेष चर्चेचा विषय ठरत आहे…






