इंदापूर

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालयात आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे यांना अभिवादन

प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले वंदन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालयात आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे यांना अभिवादन

प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले वंदन

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालयात आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या १४० व्या स्मृतिदिनानिमित्त आज (दि.१७ ) रोजी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये महापुरुषांच्या विचारापासून तरुण पिढी भरकटत चालली असून त्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मा. नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी यावेळी केले.पुढे बोलताना सोनवणे म्हणाले की,सर्वच महापुरुष मानवी कल्याणासाठी झिजले मात्र स्वार्थी लोकांनी या महापुरुषांना आपापल्या जातीत बंदिस्त केले असल्याचे चित्र पाहावयास मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी मा. नगरसेवक दादासाहेब सोनवणे,ललेंद्र शिंदे,बाळासाहेब आडसुळ,ऊमेश ढावरे, नंदकुमार खंडाळे, अनिल ढावरे,अमित ढावरे, बापू मखरे,रणजित ढावरे,मोहन शिंदे,सतिश सोनवणे,संतोष शिंदे,संजय खंडाळे,यांसह अन्य समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Back to top button