इंदापूरमध्ये दोन अश्वांच्या दौडने गोल रिंगण सोहळयाची सांगता
हजारो वारकऱ्यांना इंदापूरकरांनी केले अन्नदा

इंदापूरमध्ये दोन अश्वांच्या दौडने गोल रिंगण सोहळयाची सांगता
हजारो वारकऱ्यांना इंदापूरकरांनी केले अन्नदान
इंदापूर; प्रतिनिधी
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने चालवलेला हरिनामाचा गजर, पालखी सोहळा समवेत असलेल्या दोन्हीही अश्वांनी घेतलेली दोड, दिंडीतील वारकऱ्यांच्या पायांनी हरिनामात घेतलेला ठेका, अन् टाळ मृदंगाच्या दाटीत रंगलेल्या फुगडयां, तसेच हरीनामाचा गजर करीत सावळ्या विठुरायाला आळवित भक्तीरसात भारावालेल्या, वातावरणातील संत तुकाराम महाराज पालखी सोहळांतील दुसरे गोल रींगण वारीच्या वाटेवर इंदापूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणावर मोठ्या उत्साहात पार पडले.
मज या आवडे वैष्णवाचा संग तेथे नाही लाग कळीकाळाचा । तुका महणे मन रंगिलसे ठायी माझे तुझ्या पायी पांडुरंगा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यांतोल वारकरी मंडळी जागोजागीभजन, कीर्तन, व हरीपाठ, गौळणी, भारूड, आदिवे हरीनाम गात हे मिळणारे सर्व सुख विठ्ठला तुझ्या च पायी आहे. याचा प्रत्यय देव मालोजीरावांच्या पदस्पर्शन पावण झालेल्या इंदापूरनगरीत रविवारी (दि. २९) सी. कस्तुराबाई कदम विदयालयाचा प्रांगणात रिंगण सोहळ्यासाठी दाखल झाला, रिंगवस्थळी पहिल्यांदा पालखी सोहळ्यासमोर चालत असलेला नगारखाना सकाळी ११.३० वाजता दाखल झाला. पालखी रथाच्या पुढे पालणार्या दिंडयांना रिंगण स्थळी प्रवेश आला. तांतर मुख्य पालखी रथाने रिंगणात प्रवेश केला. टाळ्या वाजवून इंदापूरकरांनी रथाचे स्वागत केले.
पालखीतील मानाचे चोपदार व पालखीचे विश्वस्त यांनी रिंगणलावण्यास सुरुवात केली. हेडेकरी, टाळकरी, विणेकरी, तुळशी, हंडा भगिनी यांनी रिंगणास प्रदक्षिणा केली. इंदापूर तालुक्यातील शासकीय अधिकारी नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी व पोलीस तसेच सामाविक कार्यकर्ते यांनी पालखीच्या गोल रिंगणात परिक्रमा केली. जागेवर पावल्या खेळत राळकऱ्यांनी वारकरी सांप्रदायातील लगोर्या खेळले, पुणे जिल्ह्यातील शेवटचे गोल रिंगण असल्यामुळे, सोलापूर जिल्हा व इतर जिल्ह्यातील हजारो भक्तगण यांनी हरीनामाचा गजर करत रिंगण सोहळ्यास दाद दिली.
गोल रिंगण सोहळयातील खास आकर्गक दोन अत्वांची रिंगण पाहण्यासाठी चंदा मोठी गर्दी झाली होती. अश्वांना परिक्रमेसाठी रिंगणातदाखल करण्यात आले. या दोन अश्वांचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार श्वेता महाले, माजी आमदार विलास लांडे, कर्मयोगी शंकराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, युवक नेते राजवर्धन पाटील, महारुद्र पाटील, अमोल भिसे, माऊली को, विठ्ठल मनसे, स्वप्निल राउत, पोपट पवार, अजिंक्य वाघ, अनिकेत बाप, किशोर पवार, बाळासाहेब हरणावळ यांच्यामत सर्वपक्षीय नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिंगण आखलेल्या लाल मातीवर अश्व वार्याच्या वेगाने, दोन्हीही धावले.हरिनामाचा गजर झाला. या अश्वांच्या रापाखालची माती उपस्थित भक्तगणांनी क्याली लावली. या दोन अश्वांच्या दौडने रिंगण सोहळ्याची सांगता झाली. करे टाळी बोला मुखी नाम विङ्गल विठ्ठल माया। पेोवेळा हा मुख सोहळा स्वगी नाहि,या तुकोबारायांचा वचनाप्रमाणे आम्ही हरीचे दास तुम्हाला विनवती, हाताने टाळी आणि मुखाने हरिनाम च्या. अशी हरीची भगवी पताका नाचवत निघालेला हा वारकरी समुदाय सर्व स्तरातील लोकांना अशाच हरिनामाचा संदेश देत होता. वाकलेल्या टाळातून व पखवाजातून विदुल विद्युत शानोबा तुकाराम… ज्ञानोबा तुकाराम असाच नामघोष इंदापूरकरांना हरिनामाची गोडीलावत होता, अश्वांच्या परिक्रमेनीतर फुगड्या महिला भगिनींनी भरल्या तांतर संत तुकाराम महाराजांची प्रशिक्षण संस्था प्रांगणात पालखी सोहळा मुक्कामासाठी दाखल झाला.
इंदापूर शहरात प्रारंभ करण्याअगोदर बायपास फूल परिसरात संत गुलाबथावा भक्त परिवार इंदापूर, माढा, करमाळा यांच्या वतीने हजारो वारकऱ्यांना मसाला भात व चहा पाणीवाटप करण्यात आले, हरिनामाच्या गजरात हा महा झालेला स्वयंशिस्तिचा महासोहळा इंदापूर शहरात पोहचताच इदापूर-अकलूज -बारामती या चौकात इंदापूर शहराच्या वतीने माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी सारखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, शहा परिवाराचे प्रमुख मुकुंद शहा, मुख्याधिकारी रमेश वगे, लकार्यालयार जीवन बनसोडे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननकरे, प्राध्यापक कृष्णाजी ताटे, उद्योजक संजय दोशी, सर्व शासकीय अधिकारी व सर्व नगरसेवक यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.