इंदापूर

इंदापूरला जलसंधारणाच्या कामांसाठी ४९ कोटींचा निधी

मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

इंदापूरला जलसंधारणाच्या कामांसाठी ४९ कोटींचा निधी

मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुक्याच्या खेडोपाड्यातील ओढ्या नाल्यांवर ६५ ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधणे व ५ ठिकाणी पाझर तलाव रूपांतरित करणे व तीन बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी मिळून राज्याच्या जलसंधारण खात्यातून ४९ कोटी ३ लाख ९३ हजारांचा निधी मंजूर केल्याची माहिती मृद् व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

तालुक्यातील रस्ते,वीज,पाणी आदी विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणत असतानाच मंत्री भरणे यांनी तालुक्यातील जलसंधारणाची कामे करण्यासाठी हा निधी उपलब्ध केल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. गावोगावच्या ओढया नाल्यांवर बंधारे झाल्यास वाहून जाणारे पावसाचे पाणी आडवून ठेवता येणार आहे.त्यामुळे भुजलसाठा वाढणार असून सिंचनाचा टक्का वाढविण्यासाठी मदत होणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने व्याहाळी साठवण तलाव ७.५८ कोटी,शेटफळगढे साठवण तलाव ५.२५ कोटी,काळेवाडी साठवण तलाव ७.५२ कोटी,भावडी साठवण तलाव ५.४८ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.याठिकाणी रूपांतरित साठवण तलाव करण्यात येणार आहेत.न्हावी येथे १ कोटी २३ लाखांचा निधी खर्चून नवीन पाझर तलाव बांधण्यात येणार आहे.तर तालुक्यातील कळस गजानन वायाळ शेत ३२.१० लाख,कळस गावडे वस्ती ३१.२४ लाख,ओमासे शेत ४०.७६ लाख, पिटकेश्वर जाधव वस्ती २५.५३ लाख,पिटकेश्वर सुजित भिसे शेत ३०.६५ लाख,कौठळी गावठाण ४२.१३ लाख,कौठळी रतीलाल काळेल ३२.६८ लाख,कडबनवाडी रोहिदास गावडे शेत २६.५९ लाख,सराफवाडी मोहंमद शेख वस्ती ५६.०२ लाख,दगडवाडी चव्हाण वस्ती ५०.८४ लाख,भांडगाव यमाई माता मंदिर ४१.८४ लाख,भांडगाव बर्गे शेत २८.७३ लाख,भांडगाव गायकवाड शेत ३५.१० लाख,कळंब सुनील सोलनकर शेत २१.०८ लाख,कळंब अनिल सोलनकर शेत २६.०४ लाख,कळंब वीरवस्ती ३४.७६ लाख,बावडा बागल शेत ४४.६२ लाख,बोराटवाडी दादा साखरे मळा ३०.५९ लाख,बोराटवाडी हेगडकर अवताडे शेत ३०.६५ लाख,गलांडवाडी विठ्ठलवाडी गोविंद बोराटे शेत ४०.०९ लाख,गलांडवाडी,विठ्ठलवाडी डाकेवस्ती ३४.१५ लाख मंजूर करण्यात आले आहेत.

तसेच गलांडवाडी विठ्ठलवाडी तुळशीराम बोराटे शेत ४०.०९ लाख,शिरसटवाडी राहुल जाधव शेत ४३.७७ लाख,शिरसटवाडी अप्पा माळी वस्ती ३६.९० लाख,शिरसटवाडी भानुदास नागाळे वस्ती ३६.४३ लाख,शिरसटवाडी शिवदास हगवणे मळा ३९.८५ लाख,शिरसटवाडी रंजना देवकर शेत २६.०९ लाख,शिरसटवाडी हनुमंत कदम मळा ६१.०७ लाख,चाकाटी सुभाष तनपुरे शेत २४.९८ लाख,काझड म्हेत्रे शेत २५.९८ लाख,काझड म्हेत्रे विहीर ३०.८७ लाख,काझड हनुमानवाडी २५.९३ लाख,काझड नाना नरुटे शेत २५.०२ लाख,बोरी धनु शिंदे शेड २४.२८ लाख,बोरी चांगण गुरुजी शेत २४.३० लाख, तरंगवाडी चितळकर तरंगे शेत २४.८३ लाख,तरंगवाडी तुकाराम करे शेत २४.७० लाख,निंबोडी महादेव घोळवे विहीर २३.८२ लाख,गोपीचंद घोळवे शेत २३.७४ लाख,मारुती घोळवे विहीर २३.८० लाख,गोतंडी स्मशानभूमी ३२.१९ लाख,गोतंडी जेनवडी अडसूळ २५.३३ लाख,गोतंडी भरत नलवडे शेत २३.८५ लाख,गोतंडी हनुमंत लोहकरे शेत २५.७० लाख,गोतंडी अमोल जाधव शेत ३२.१९ लाख,गोतंडी संतोष भोसले शेत २५.७० लाख.

तर रणगाव हनुमंत रकटे ३७.१७ लाख,निमसाखर रणजित पवार बंगला ३६.६० लाख,रेडणी हनुमंत कदम, सुभाष पाटील ३२.११ लाख,रेडणी नारायण रुपनवर, सुभाष पाटील शेत ३२.३७ लाख,खोरोची अनिल नगरे, सलगर शेत ४०.४७ लाख,पिंपळे बापू ठवरे ३४.१९ लाख,काटी पडसळकर मळा २४.९९ लाख,रेडा गट नं.२५४ २९.५० लाख,रेडा उत्तम देवकर मळा २९.६१ लाख, कालठन नं.१ जगताप वस्ती ४५.४४ लाख,निमगाव केतकी अमोल हेगडे मळा २५.४७ लाख,भोसले वस्ती ५१.०५ लाख,गुजर मळा ३५.१३ लाख,गोखळी पारेकर वस्ती २२.८२ लाख,गोखळी अण्णा तरंगे, महादेव क्षीरसागर शेत २८.१२ लाख,गोखळी तरंगे वस्ती २३.७८ लाख,गोखळी अंकुश वाघमोडे २४.७० लाख,मदनवाडी म्हसोबा मंदिर ६२.१३ लाख व कचरवाडी श्रीरंग शेंडगे विहीर ३५.५७ लाख या गावांतील ओढ्यांवर मिळून ६५ ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात येणार आहेत.याशिवाय मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत कडबानवाडी येथील दोन व निरगुडे येथील एका बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ५६ लाख ९३ हजारांचा निधीही मंजूर करण्यात आल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram