इंदापूर

इंदापूरात’आरोग्य जनजागृती कार्यशाळा’ संपन्न; तज्ञांनी दिले आरोग्याचे धडे

दि.१२ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० ते २.०० या वेळेत आयोजित

इंदापूरात’आरोग्य जनजागृती कार्यशाळा’ संपन्न; तज्ञांनी दिले आरोग्याचे धडे

दि.१२ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० ते २.०० या वेळेत आयोजित

इंदापूर; प्रतिनिधी

शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ.गिरीश देसाई,खजिनदार श्री.तुषार रंजनकर व विश्वस्त श्री.अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि आरोग्य संदेश प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज इंदापूर येथे ‘आरोग्य जनजागृती कार्यशाळा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाली. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट च्या हॉल मध्ये दि.१२ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० ते २.०० या वेळेत आयोजित या कार्यशाळेला संस्थेच्या विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यशाळेत विविध आरोग्यविषयक पैलूंवर तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. संतोष काटकर, डॉ. सौ.पल्लवी काटकर, रणजीतकुमार मोदी आणि सौ. पूनम मोदी यांचा समावेश होता. त्यांनी उपस्थितांना आरोग्य जपण्याचे महत्त्व आणि विविध आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सखोल माहिती दिली.

याशिवाय, अमेरिका, सौदी अरेबियासह ३० देशांत औषध निर्यात करणाऱ्या भारतीय आयुर्वेदिक कंपनीमार्फत विविध प्रॉडक्ट्सच्या माहितीची ओळख करून देण्यात आली. यासोबतच प्रत्येक गावात आरोग्य मित्र आणि आरोग्य दूत असावेत, या संकल्पनेवरही चर्चा झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संदेश शाह यांनी केले. तर आभार प्रदर्शन शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट चे विश्वस्त श्री.अरविंद गारटकर यांनी केले.

या कार्यक्रमप्रसंगी डॉ.राधिका शहा,डॉ.जयशंकर विभूते, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट च्या आरोग्य केंद्राचे प्रमुख श्री.महादेव चव्हाण, कोपिवरची शाळा प्रमुख श्री.भारत बोराटे, कार्यकर्ते हमीदभाई अत्तार, नवनाथ सुपेकर, ट्रस्टचे इन्चार्ज श्री.दिपक जगताप, श्री.अमोल राउत, रोहिणी जाधव,केदार गोसावी, भारत माने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button