इंदापूरातील शिबिरात 150 जणांचे रक्तदान
शिबिराचे उद्घाटन कर्मयोगीचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या हस्ते

इंदापूरातील शिबिरात 150 जणांचे रक्तदान
शिबिराचे उद्घाटन कर्मयोगीचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या हस्ते
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय धनंजय वाशिंबेकर यांच्या 10 व्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 150 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.श्रीमंत शिवराज प्रतिष्ठान अखिल मंडई येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन कर्मयोगीचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या हस्ते झाले.
या वेळी माजी नगरसेवक पोपट शिंदे, फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल शेटे पाटील, अमर गाडे, गजानन गवळी, अनिकेत वाघ, गणेश महाजन, अक्षय सूर्यवंशी, अर्शद सय्यद, रमेश शिंदे, प्रशांत उंबरे आदी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरामध्ये रक्त संकलनासाठी सोलापूर येथील मल्लिकार्जुन ब्लड बँक व प्रकाश सातपुते यांचे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वितेसाठी सोमनाथ खरवडे, इम्रान शेख, भावेश ओसवाल, राहुल चित्राव, अनिरुद्ध पाचनकर, विकी पवार, व्यंकटेश वाशिंबेकर, वैभव संभुदास, अमृत मिश्रा, अभिजित कवितके यांनी प्रयत्न केले.