इंदापूरातील सत्तावन्न ग्रामपंचायतींसाठी 81.76 टक्के मतदान
आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा लागली पणाला
इंदापूरातील सत्तावन्न ग्रामपंचायतींसाठी 81.76 टक्के मतदान
आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा लागली पणाला
इंदापूर : सिद्धार्थ मखरे ( प्रतिनिधी )
इंदापूर तालुक्यात सत्तावन्न ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 81.76 टक्के मतदान झाले आहे. अनेक ग्रामपंचायती ठिकाणी 80 ते 90 टक्के सरासरी म्हणजेच मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने बऱ्याच ठिकाणी सत्ताबदल होऊन अत्यंत कमी अशा फरकाने अनेक उमेदवार विजयी होतील असे तालुक्यातील राजकिय विश्लेषकांचे मत आहे.
इंदापूर तालुक्यातील 57 ग्रामपंचायती साठी 1 लाख 58 हजार 599 एकूण मतदारांपैकी 1 लाख 29 हजार 666 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून झालेली सरासरी टक्केवारी पुढीलप्रमाणे:-भिगवण 79.89 टक्के, तक्रारवाडी 82.34, पोंधवडी 90.21 टक्के, कुंभारगाव 89.34 टक्के, अकोले 86.07 टक्के, शेटफळ 84.83 टक्के, निंबोडी 88.99 टक्के, निरगुडे 89.63 टक्के, पिंपळे 86.47 टक्के, भांडगाव 85.27 टक्के, भोडणी 78.38 टक्के, पिंपरी बुद्रुक 89.54 टक्के, नरसिंहपूर 83.07 टक्के, टण्णू 88.83 टक्के, गिरवी 91.89 टक्के, गोंदी ओझरे 90.65 टक्के, चाकाटी 90.14 टक्के, पिठेवाडी 89.90 टक्के, भादलवाडी 69.52, कळस 83.89 टक्के, भरणेवाडी 80.72 टक्के, वालचंदनगर 58.92 टक्के, कळंब 77.27 टक्के, अंथुर्णे 81.50 टक्के, पळसदेव 85.95 टक्के, रुई 83.85 टक्के, गलांडवाडी नंबर 1/नरुटवाडी 87.36 टक्के, लोणी देवकर 88.42 टक्के, भावडी 90.11 टक्के, चांडगाव 90.23 टक्के, बळपुडी 96.88 टक्के, सरडेवाडी 86.97 टक्के, शहा 90.91 टक्के, बाभूळगाव 87.34 टक्के, गलांडवाडी नंबर 2- 92.10 टक्के, तरंगवाडी 89.02 टक्के, वरकुटे खुर्द 84.46 टक्के, काटी 83.54 टक्के, रेडा 87.89, सराफवाडी 90.19 टक्के, पिटकेश्वर 89.35 टक्के, सणसर 75.11 टक्के, तावशी 78.92 टक्के, सपकळवाडी 86.07 टक्के, लासुर्णे 74.61 टक्के, चिखली 93.14 टक्के, निमगाव केतकी 80.98 टक्के, कौठळी 74.38 टक्के, व्याहाळी 85.56 टक्के, कडबनवाडी 88.76 टक्के, कचरवाडी (निमगाव केतकी) 91.22 टक्के, निमसाखर 78.79 टक्के, गोतंडी 85.09 टक्के, निरवांगी 82.73 टक्के, हगारवाडी 87.45 टक्के, दगडवाडी 85.39 टक्के, घोरपडवाडी 82.04 टक्के, अशी आहे.
इंदापूर तालुक्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून सोमवारी (ता.18) रोजी इंदापूर येथील शासकीय गोडाऊन येथे मतमोजणी होणार आहे.
दरम्यान संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली मात्र निवडणुकीच्या मतमोजणी नंतर विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक/रॅली काढणे,पराभूत उमेदवारांच्या घरासमोर फटाके फोडणे,विरोधी गटातील कार्यकर्त्यांच्या अंगावर गुलाल उधळणे, परवानगीशिवाय बॅनर लावणे याप्रकारे गैरकृत्य घडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता व त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात 18 जानेवारी रोजी 00:00 वाजले पासून 24:00 वा. दरम्यान 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पुणे यांनी दिले आहेत.