इंदापूरात आज ८४ जण कोरोनाबाधित; एकाचा मृत्यू.
तालुक्यात आतापर्यंत ६८ जणांचा मृत्यू झाला आहे.
इंदापूरात आज ८४ जण कोरोनाबाधित; एकाचा मृत्यू.
तालुक्यात आतापर्यंत ६८ जणांचा मृत्यू झाला आहे.
इंदापूर : बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यात आज वेगवेगळ्या तपासण्या झाल्या. यामध्ये काटी व अंथुर्णे येथील अॅक्टीव्ह सर्व्हे तसेच बारामतीतील खासगी प्रयोगशाळामधील तपासण्यांमधून आज दिवसभरात ८४ जण कोरोनाबाधित आढळून आले. तर निरनिमगाव येथील ७७ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुक्यात आतापर्यंत ६८ जणांचा मृत्यू झाला आहे.
इंदापूरातील शासकीय तपासणीदरम्यान आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये काटी येथील ४७ वर्षीय पुरूष, ४२ वर्षीय पुरूष, कळाशी येथील ४० वर्षीय पुरूष, इंदापूर अंबिकानगर येथील ८ वर्षीय मुलगा, सराटी येथील २७ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरूष, सरडेवाडी येथील ४२ वर्षीय महिला, १८ वर्षीय युवक, शेळगाव येथील ३५ वर्षीय पुरूष, तावशी येथील ६० वर्षीय महिला, गोतंडी येथील ४२ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर सरस्वतीनगर येथील २८ वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरूष, ३८ वर्षीय महिला, ४२ वर्षीय पुरूष, १६ वर्षीय युवती, १५ वर्षीय युवती, ६ वर्षीय मुलगा, बेलवाडी येथील २० वर्षीय युवक, वरकुटे खुर्द येथील ६५ वर्षीय महिला, पडस्थळ येथील ५८ वर्षीय महिला, बेलवाडी येथील ७० वर्षीय पुरूष, ४२ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
लासुर्णे येथील ३८ वर्षीय महिला, बोरी येथील ३४ वर्षीय महिला, बिल्ट कंपनी भादलवाडी येथील ४१ वर्षीय पुरूष, ३४ वर्षीय महिला, १० वर्षीय मुलगी, भिगवण येथील ४२ वर्षीय पुरूष, ४३ वर्षीय पुरूष, २३ वर्षीय युवक, भिगवण येथील ३६ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
अंथुर्णे येथे आज झालेल्या अॅक्टीव्ह सर्व्हेमध्ये १७ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. अंथुर्णे गावात २२ पथकांनी केलेल्या तपासणीदरम्यान १२४५ कुटुंबांतील ५ हजार ९४८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी ७८ संशयित आढळून आले, त्यांची रॅपीड अॅंटिजेन चाचणी करण्यात आली.
यामध्ये १२ वर्षीय मुलगा, ५२ वर्षीय पुरूष ,४३ वर्षीय पुरूष, १८ वर्षीय मुलगा, ४२ वर्षीय पुरूष, १६ वर्षीय मुलगा, ५० वर्षीय पुरूष, १८ वर्षीय मुलगा, २६ वर्षीय युवक, ३२ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय पुरूष, ६५ वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगी, ३० वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगा, ३५ वर्षीय महिला, ४० वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
काटी येथेही आज अॅक्टीव्ह सर्व्हे करण्यात आला. २२ पथकांनी केलेल्या तपासणीदरम्यान ९९१ कुटुंबातील ४ हजार ७२९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४९ संशयित आढळले, त्यांची रॅपीड अॅंटिजेन केली असता, त्यामध्ये १४ जण कोरोनाबाधित आढळले.
यामध्ये १४ वर्षीय युवक, ६० वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरूष, ११ वर्षीय महिला, ३५ वर्षीय महिला, १३ वर्षीय मुलगा, १० वर्षीय मुलगा, ६५ वर्षीय पुरूष, ५४ वर्षीय पुरूष, ३६ वर्षीय महिला, ६५ वर्षीय महिला, ७२ वर्षीय पुरूष, १८ वर्षीय मुलगी, ३६ वर्षीय महिला रुग्ण आढळून आले.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे झालेल्या तपासणीदरम्यान आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पोंदवडी येथील ४६ वर्षीय पुरूष, भादलवाडी येथील बिल्ट कॉलनीतील २५ वर्षीय महिला, ४२ वर्षीय पुरुष, १५ वर्षीय युवक, २० वर्षीय युवक, ४० वर्षीय महिला, भिगवण मदनवाडी चौक येथील ५८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
जंक्शन येथील महाराष्ट्र बॅंकेजवळील २८ वर्षीय पुरूष, वालचंदनगर येथील ५२ वर्षीय पुरूष, व्याहाळी येथील ३४ वर्षीय पुरूष, लाखेवाडी येथील ६० वर्षीय पुरूष, लासुर्णे येथील मेन पेठेतील ३० वर्षीय पुरूष,अंबिकानगर इंदापूर येथील २९ वर्षीय महिला, सरस्वतीनगर येथील ७० वर्षीय पुरूष, शेळगाव येथील ५४ वर्षीय पुरूष, इंदापूर- टेंभूर्णी नाकातळ येथील २८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील डॉ. पवार लॅबोरेटरी येथील शिंदेवाडी, काझड येथील ३१ वर्षीय पुरूष, लासुर्णे येथील ६६ वर्षीय महिला, ७५ वर्षीय महिला रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.