बारामतीच्या ‘ त्या ‘ बहुचर्चित अतिक्रमणावर नगरपालिकेचा हातोडा
अनेक दिवसांपासून प्रलंबित होते अतिक्रमण

बारामतीच्या ‘ त्या ‘ बहुचर्चित अतिक्रमणावर नगरपालिकेचा हातोडा
अनेक दिवसांपासून प्रलंबित होते अतिक्रमण
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषद हद्दीतील शिवाजी चौक येथील अतिक्रमणावर आज नगरपरिषदेच्या वतीने हातोडा पडल्याने येथील रस्त्याच्या कामास सुरुवात होणार आहे.
बारामतीतील सर्व रस्ते रुंदीकरणाचे काम मोठ्या वेगात सुरू आहे. यातच शिवाजी चौक येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा येत असलेले अतिक्रमणा विषयी चा वाद उच्च न्यायालयापर्यंत गेला होता. त्यामुळे येथील रुंदीकरणाचे काम थांबले होते. त्यावर आज पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली.
त्यामुळे आता रस्ता रुंदीकरणातील अडथळा संपुष्टात आला असून रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू होणार आहे.
या रुंदीकरणाच्या अतिक्रमणाच्या अडथळ्या बाबत संभाव्य वाद लक्षात घेता आज प्रशासनाने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता व त्या माध्यमातून येथील अतिक्रमण काढण्यात आले आहे.
या अतिक्रमणामुळे प्रलंबित असणाऱ्या रस्त्याचे कामही अतिक्रमणाच्या कारवाईनंतर सुरू करण्यात आले आहे अतिक्रमणाच्या कामानंतर येथील रस्त्यावरील डीवाईडर चे काम करून स्ट्रीट लाईट चालू करावी. अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.