इंदापूर

इंदापूरात राज्यस्तरीय कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन

दिग्गज खेळाडू होणार सहभागी

इंदापूरात राज्यस्तरीय कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन

दिग्गज खेळाडू होणार सहभागी

इंदापूर : प्रतिनिधी

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने इंदापूर येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत.

सदरची स्पर्धा दि.२१ व २२ मे रोजी इंदापूर नगरपरिषद मैदान येथे संपन्न होईल. स्पर्धेतील विजयी संघास ५१ हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तर द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी अनुक्रमे ३१ हजार,२१ हजार व २१ हजार अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे सत्कारमूर्ती मंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना या प्रसंगी मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मोहोळ चे आमदार यशवंत माने,पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते हे असणार आहेत.या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन लक्ष्मण देवकाते यांनी केले आहे.स्पर्धेसाठी विशेष असे सहकार्य तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांचे लाभणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram