इंदापूरात राष्ट्रवादी काँग्रेस (AP) गटाच्या शहराध्यक्षावर गोळीबार, विनयभंगप्रकरणी गुन्हा
अन्य 5 ते 6 व्यक्तींवर विनयभंग, जातिवाचक शिवीगाळ व गोळीबारप्रकरणी गुन्हा दाखल

इंदापूरात राष्ट्रवादी काँग्रेस (AP) गटाच्या शहराध्यक्षावर गोळीबार, विनयभंगप्रकरणी गुन्हा
अन्य 5 ते 6 व्यक्तींवर विनयभंग, जातिवाचक शिवीगाळ व गोळीबारप्रकरणी गुन्हा दाखल
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे उर्फ शैलेश पवार यांच्यासह अन्य 5 ते 6 व्यक्तींवर विनयभंग, जातिवाचक शिवीगाळ व गोळीबारप्रकरणी बुधवारी (दि.14) मे रोजी रात्री उशिरा एका महिलेने गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, शैलेश पवार ऊर्फ बाळासाहेब ढवळे याने पंधरा दिवसांपूर्वी त्याच्या गाडीने फिर्यादी खासगी ठिकाणी कामावर जात असताना पाठलाग करून फिर्यादीस, तू खूप आवडते. तुझा पती माझा मित्र आहे. मी बघतो काय करायचे ते, मला भेट,’ असा म्हणाला. त्यानंतरही तो वारंवार येऊन फिर्यादीचा पाठलाग करत होता. त्यानंतर त्याने फिर्यादीचे मनात लज्जा उत्पन्न होइल, या हेतुने तीचा हात धरुन ‘गाडीत बस मला बोलायचे आहे’ असे म्हणाला. त्यावेळी फिर्यादीने त्याच्या तावडीतून आपली सुटका केली. त्यानंतर सोमवारी (दि.12) मे रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या पतीचा मित्र सनी मिसाळ, कुणाल धोत्रे हे बाळासाहेब ढवळे यांच्या घराकडे गेले. तेव्हा बाळासाहेब ढवळे, शुभम पवार (दोघेही रा. सरस्वतीनगर, इंदापूर) व इतर 4 ते 5 लोक हे यातील फिर्यादी यांचे पती व त्यांचे मित्र यांच्यात झटापटी करत होते. तेव्हा फिर्यादी हे त्यांची भांडणे सोडवित असताना यामधील बाळासाहेब ढवळे याने त्याचे हातातील पिस्तुलाने फिर्यादीचा नवरा यांच्यावर गोळी झाडली. तेव्हा ते खाली वाकल्याने गोळी त्यांना लागली नाही. त्यामुळे त आणखी दोन वेळा त्यांच्यावर गोळ्या मारुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.यावरून गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड करीत आहेत.