इंदापूर

इंदापूर अकलूज रस्त्यावर ट्रक व कारचा झाला भीषण अपघात

अपघातात पती-पत्नी जागीच ठार

इंदापूर अकलूज रस्त्यावर ट्रक व कारचा झाला भीषण अपघात

अपघातात पती-पत्नी जागीच ठार

बारामती वार्तापत्र

ट्रक व कारच्या झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील दांपत्याचा मृत्यू झाला.आज (दि.३) सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास इंदापूर अकलूज राज्य रस्त्यावर विठ्ठलवाडी जवळ ही घटना घडली. पांडुरंग सिताराम ताथवडे (वय ५८वर्षे),रुक्मिणी पांडुरंग ताथवडे (वय ५० वर्षे दोघे रा.खडकी पुणे, मुळ गाव केंदुर पाबळ ता.शिरुर जि.पुणे) अशी दुर्देवी मृत्यू झालेल्या पती पत्नीची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, अकलूजकडून इंदापूरकडे भरधाव वेगात निघालेल्या टाटा ट्रक (क्र.एम.एच १२ एम.व्ही. ७४३४) ची व इंदापूरकडून अकलूजच्या दिशेने निघालेली नेक्सॉन कार (क्र.एम.एच.१२ आर.एफ.२६६२) यांची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात हातपाय व डोक्याला जबर मार लागल्याने दांपत्य जागीच मरण पावले.अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.अपघातानंतर फरार झालेल्या अज्ञात ट्रक चालकाविरुध्द इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button