इंदापूर

इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव राज्यकर्ता पुरस्काराने सन्मानित

सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्याबद्दल गुणगौरव

इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव राज्यकर्ता पुरस्काराने सन्मानित

सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्याबद्दल गुणगौरव

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव यांना न्यूज लाईन मिडिया यांचा यंदाचा राज्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट मुंबई येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल देवराव जाधव यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. एक बांधकाम मजूर ते यशस्वी उद्योजक हा त्यांचा जीवन प्रवास थक्क करणारा असून सुरुवातीच्या काळात एक बांधकाम मजूर म्हणून काम करणारे जाधव हे त्या क्षेत्रात यशस्वी कॉन्ट्रॅक्टर म्हणून नावारूपाला आले. बांधकाम व्यवसाय क्षेत्रात आपली ओळख निर्माण करून त्यांनी हजारो बेरोजगार कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. हा प्रवास सुरू असताना त्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण करून निमगाव केतकीचे सरपंच पद भूषविले.त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या पदावर देखील त्यांनी आपला ठसा उमटवला. सध्या ते इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे.

कोरोना महामारीच्या काळात अन्नधान्य तसेच जीवनावश्‍यक वस्तूंच्या कीटचे वाटप करून असंख्य कुटुंबांना मदतीचा हात देऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. अडचणीच्या काळात मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.याचीच दखल घेत न्यूज लाईन मीडियाने राज्यकर्ता पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री भारती पवार, वृद्ध व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख तसेच सह्याद्री मल्टीस्टेट फायनान्स चे चेअरमन संदीप थोरात व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button