जिल्हा सत्र न्यायालयाचे इंदापुर येथे आज उद्घाटन
विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हा सत्र न्यायालयाचे इंदापुर येथे आज उद्घाटन
विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूरात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व्या न्यायालयाचे उद्घाटन शनिवारी (दि.25) मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे त्यांच्या हस्ते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. गिरीश शहा यांनी दिली.
तालुक्यातील नागरिकांना अतिरिक्त जिल्हा कोर्ट व सेशन कोर्ट आणि दिवाणी कोर्ट वरील स्तरावरील न्यायालयीन कामकाजासाठी बारामती येथे जावे लागत होते. यामुळे पक्षकार तसेच वकील यांची मोठी गैरसोय होत होती, तसेच ये-जा करण्यात वेळ व पैसाखर्च होत होता. यामुळे तालुक्याच्या ठिकाणी अशी सोय व्हावी, अशी वकील संघटनेच्या वतीने तसेच पक्षकारांमधून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर कोर्टाची स्थापना करण्यास दोन महिन्यापूर्वी मान्यता दिली. त्यानंतर प्रशासनाकडून सदर न्यायालयाच्या प्रशासकीय व्यवस्थेची तयारी करण्यात आली.
सर्व कामकाज पूर्ण झाल्यामुळे शनिवारी (दि.24) सदर जिल्हा व सत्र न्यायालयाचे उद्घाटन होणार असून, या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप वि. मारणे, न्यायमूर्ती आरिफ सा. डॉक्टर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.