इंदापूर आगार व तालुक्यातील प्रमुख बसस्थानकांच्या सुविधां संदर्भात परिवहन मंत्री यांच्याकडून मागण्या मान्य – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
चालक-वाहक यांच्यासाठी आवश्यक सेवा-सुविधांच्या मागण्यांवर भर

इंदापूर प्रतिनिधी –
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ‘इंदापूर आगार तसेच बावडा, भिगवण व निमगाव केतकी बसस्थानकांतील विविध समस्या व सेवा-सुविधांबाबत विधानभवन, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक होते तसेच परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली.
बैठकीदरम्यान मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रवासी तसेच चालक-वाहक यांच्यासाठी आवश्यक सेवा-सुविधांच्या मागण्यांवर भर दिला. यामध्ये बसस्थानकांचे नूतनीकरण, अंतर्गत काँक्रीटीकरण, रंगरंगोटी, स्वच्छतागृह,तसेच प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट उभारण्याच्या सुविधांचा समावेश होता.
यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून, प्रवाशांना आवश्यक सेवा-सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
या बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी आणि एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती असे मंत्री दत्तात्रय भरणे माहिती दिली.