इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व स्टाफ यांना शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल.
डॉक्टरांना मारहाण झाल्याने अनेकांनी निषेध नोंदवला.
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व स्टाफ यांना शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल.
डॉक्टरांना मारहाण झाल्याने अनेकांनी निषेध नोंदवला.
बारामती वार्तापत्र
कोरोना संकटात अविरत काम करणाऱ्या डॉक्टर्स ,कर्मचारी यांच्याशी गैरवर्तन व शिवीगाळ केल्याचा बारामती येथे घडलेला प्रकार ताजा असतानाच पुणे जिल्ह्यातील इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहान व शिवीगाळ झाल्याची घटना दि.16 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली असल्याने कोविड योध्दा म्हणून रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांची सुरक्षा धोक्यात आली आहे.याबाबत इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.एकनाथ इराप्पा चंदनशिवे यांनी कलम 353,332,427,504,506 नुसार शंकर सुरेश जाधव रा.शेळगांव ता. इंदापूर जिल्हा पुणे याचे विरूद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार(जबाब)नोंदवला आहे.
या जबाबात म्हटले आहे कि, मी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय इंदापूर येथे वैद्यकीय अधिक्षक या पदापर काम करत असून उपजिल्हा रुग्णालय येथे एकूण 7 डॉक्टर आधिकारी व 12 अधिपरिचारीका असे नेमणुकीस असून सध्या कोविड 19 या संसर्गजन्य रोगावरील उपचाराकरीता अधिकचे 9 डॉक्टर अधिकारी व 12 अधिपरिचारीका स्टाफ उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे कार्यरत असून तो नेमुन दिलेल्या शिफ्ट प्रमाणे काम करतात.दि.16/9/2020 रोजी सायंकाळी 6/00 या सुमारास मी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे राऊंडवर असताना व दाखल रुग्णांची माहीती घेत असताना मी ओ.पी.डी. परिसराजवळ असताना शेवंता सुभाष भोसले या महिला त्यांची आई हिराबाई सुरेश जाधव वय 55 वर्षे रा. शेळगांव ता.इंदापूर जि.पुणे यांना हाँस्पीटल मध्ये अँडमिट करण्यासाठी घेवुन आल्या. त्यावेळी मी शेवंता भोसले यांना आजींना काय झाले आहे अशी विचारपुस करुन हिराबाई यांची तपासणी केली असता हिराबाई यांचे हृदयाचे ठोक्याया दर 24 परमिनिट असा तर ऑक्सीजन लेवल 60 टक्केहून कमी होता. त्यावेळी मी शेवंता भोसले यांना आजी हिराबाई यांची तब्येत क्रिटीकल असेलेबाबत सांगुन यांना पुढील उपचाराकामी बारामती येथे घेवुन जा असे सांगितले. शेवंता भोसले यांनी आम्हाला विनंती केल्याने आम्ही आजी हिराबाई यांना डेडीकेटेड कोवीड युनिट येथील कर्तव्यावर असलेले डॉक्टर अनिरुद्ध दत्तात्रय गार्डे यांना बोलावून घेवुन आजी हिराबाई यांना डेडीकेटेड कोविड युनिट येथे अँडमिट करुन घेऊन आजी हिराबाई यांची कोविड टेस्ट करुन त्यांचेवर एमरजन्सी जीवनावश्यक उपचार तात्काळ सुरु करणेबाबत सुचना दिल्या.
त्यानंतर अनिरुध्द गार्डे यांनी आजी हिराबाई यांना उपजिल्हा रुग्णालयातील तिस-या मजल्यावरील डेडीकेटेड कोविड युनिट येथे अॅडमिट करुन घेऊन उपचार चालु केले. त्यावेळी प्रथम व्हेंटिलेटर द्वारे कृत्रिम ऑक्सीजन देऊन जीवनावश्यक atropine, adrenaline अशा पध्दतीची औषध देऊन आजीचे हृदयाचे ठोके व ऑक्सीजन लेवल पुर्ववत होणेसाठी उपचार चालु केले.परंतु आजी हिराबाई यांचेकडुन औषधोपचार सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर डॉक्टर अनिरुध् गार्डे यांनी मला तसेच डॉक्टर सुहास शेळके यांना फोनव्दारे माहिती दिली.
त्यानंतर आजी हिराबाई याची मुलगी शेवंता भोसले यांना फोनव्दारे तसेच समक्ष आजी हिराबाई यांची तब्येत क्रीटीकल असुन त्यांची काही एक गॅरंटी नसलेबाबत सांगितले होते.
त्यानंतर रात्री 08 वाजताचे सुमारास आजी हिराबाई ह्या मयत झाल्याने आम्ही त्याचे व्हेन्टीलेटर काढून त्यांची मुलगी शेवंता भोसले यांना सदर बाबत कळविले. त्यावेळी त्यांचे भाऊ शंकर सुरेश जाधव रा.शेळगाव ता. इंदापुर जि. पुणे यांनी तुम्ही माझे आई हिराबाई हिचा व्हेन्टीलेटर का काढला ? असे म्हणुन डॉक्टर अनिरुध्द गार्डे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करु लागला. त्यावेळी डेडीकेटेड कोविड युनिट मधील अधिपरिचारीका शितल सुधिर सोनवणे,राणी बापु जाधव, सुषमा सतिश भोसले ह्या शंकर जाधव यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी वरील अधिपरिचारीका यांना तसेच डॉ. अनिरुध्द गार्डे यांना हाताने लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात करुन मोठमोठ्याने शिवीगाळ करुन तुम्ही येथे नोकरी कशी करता तेच बघतो. तसेच तुम्हाला खोट्या गुन्ह्यात नाही अडविले तर माझे नाव बदलुन ठेवा. अशी दमदाटी करुन कोवीड वॉर्डातील रुग्णांच्या उपचारा करीता असलेल्या वैद्यकीय साधनांची फेकाफेक करुन नासधुस केली. त्यावेळी वरील सर्व स्टाफ घाबरुन जाऊन तळमजल्याकडे पळत आला. त्यावेळी शंकर जाधव हे स्टाफ मागे पळत येऊन त्यांनी स्टफला मारहाण व शिवीगाळ चालुच ठेवली. म्हणून त्यांनी डॉ.अनिरुध्द गार्डे तसेच अधिपरिचारीका शितल सोनवणे,राणी जाधव, सुषमा भोसले हे त्यांचे शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांचे शासकीय कर्तव्यात अडथळा आणला आहे. म्हणुन शंकर सुरेश जाधव रा.शेळगाव ता.इंदापूर जि. पुणे यांचे विरुध्द वैद्यकीय अधिक्षक यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पुढील तपास हेड काँन्सेबल शिरीष लोंढे करीत आहेत.