इंदापूर करांसाठी धोक्याची घंटा.
इंदापूर शहर व तालुक्यात एकाच दिवसात सापडले कोरोनाचे १३ नवे रुग्ण
इंदापूर करांसाठी धोक्याची घंटा.
इंदापूर शहर व तालुक्यात एकाच दिवसात सापडले कोरोनाचे १३ नवे रुग्ण.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
इंदापूर तालुक्यातील नागरिकांसाठी चिंताजनक बातमी आहे.इंदापूरमध्ये आज दि.२ जुलै रोजी तब्बल नवीन १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
दि.१ जुलै रोजी इंदापूर शहरातील एका ७२ वर्षीय पुरुषास आणि जंक्शन परिसरातील ३५ वर्षीय महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.तर दि.३० जून रोजी इंदापूर तालुक्यातील शेळगाव मधील ३२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते.
या सर्व रुग्णांच्या संपर्कातील ३७ व्यक्तींचा स्वाब घेण्यात आला होता त्यापैकी आज तब्बल १३ व्यक्तींची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे इंदापूर करांना एकच धक्का बसला आहे.
इंदापूर शहरातील पाच व्यक्तींना कोरोना झाल्याचे समोर आले असून शेळगाव मधील ३२ वर्षे रुग्णाच्या संपर्कातील पाच व्यक्तींना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.तर जंक्शन मधील महिलेच्या संपर्कातील तीन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
इंदापूर तालुक्यात कोरोनाचे एकूण ३८ रुग्ण झाले असून यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तर १६ रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना घरी देखील सोडले आहे. तर पुणे येथे ४ रुग्णांवर तर मुंबई मधील एका खासगी रुग्णालयात एकावर उपचार सुरु आहे.
इंदापूर कोविड केअर सेंटर मध्ये १४ रुग्णावर तर बारामती मधील रुई ग्रामीण रुग्णालयात एका व्यक्तीवर उपचार सुरु आहेत.
इंदापूर तालुक्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परंतु घाबरून न जाता लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.