इंदापूर काँग्रेसच्या पाठपुराव्याने तालुक्यातील दीनदुबळ्यांना मिळतोय न्याय
मिलिंद साबळे यांच्या पाठपुराव्यामुळे निराधार महिलेस मिळाला आधार
इंदापूर काँग्रेसच्या पाठपुराव्याने तालुक्यातील दीनदुबळ्यांना मिळतोय न्याय
मिलिंद साबळे यांच्या पाठपुराव्यामुळे निराधार महिलेस मिळाला आधार
इंदापुर:प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील गोरगरीब नागरिकांच्या विविध समस्या तसेच शासन स्तरावरील अडीअडचणी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याने सोडवल्या जात असून यामुळे दीनदुबळ्यांना न्याय मिळत आहे.इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस मिलिंद साबळे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे कळंब येथील अनुराधा रामचंद्र पवार या महिलेस राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य व संजय गांधी योजनेतुन २० हजार रुपयाचे अर्थसहाय्य इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्या हस्ते देण्यात आले.
मिलिंद साबळे हे पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप व इंदापूर तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस म्हणून काम करत आहेत. सामाजिक कामात व काँग्रेस पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये ते सतत अग्रस्थानी असतात.
अनुराधा रामचंद्र पवार यांना अर्थसहाय्य देतेवेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील सावंत, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष व संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य आबासाहेब निंबाळकर, निवास शेळके, संजय गांधी निराधार समिती सदस्य व तालुका काँग्रेसचे सचिव महादेव लोंढे, जाकीर काझी, चमण बागवान, भगवान पासगे, प्रदीप शिंदे उपस्थित होते.