इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे घोडे चाल स्पर्धा संपन्न
देशातील विविध राज्यातून घोडेस्वार स्पर्धेत सहभागी
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे घोडे चाल स्पर्धा संपन्न
देशातील विविध राज्यातून घोडेस्वार स्पर्धेत सहभागी
इंदापूर : सिद्धार्थ मखरे ( प्रतिनिधी )
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेली घोडे चाल स्पर्धा आज ( दि.३१) रोजी संपन्न झाली. सदर स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून या ठिकाणी घोडे दाखल झाले होते. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सुरत येथील इकबाल हाथीया यांना मिळाले तर द्वितीय पारितोषिक सुरत येथील अब्दुल खालीद अस्मान यांना मिळाले, तर तृतीय पारितोषिक जिग्नेशभाई पटेल सुरत यांना मिळाले .
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय फडतरे, मोहोळचे आमदार तथा बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन छगनराव भोंगळे, दूध उत्पादक संघाचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील, नीरा-भीमा चे व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे, सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने,नीरा-भीमा चे संचालक दत्तात्रय शिर्के, महादेव घाडगे, महारुद्र पाटील,सुभाष काळे, सर्जेराव वाघमोडे, मच्छिंद्र अभंग, विलासराव माने सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन क्रमांकास अनुक्रमे दुचाकी, एलइडी स्मार्ट टीव्ही व रेफ्रीजिरेटर अशी बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धा पाहण्यासाठी घोडे शौकिनांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.