इंदापूर

इंदापूर तालुका भाजप सोशल मिडीया पदाधिकाऱ्यांची निवड.

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र.

इंदापूर तालुका भाजप सोशल मिडीया पदाधिकाऱ्यांची निवड.

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र.

इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )

इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या सोशल मिडीया पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. एका छोटेखानी कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
तालुका अध्यक्षपदी साहेबराव पिसाळ तर इंदापूर शहर अध्यक्षपदी आनंद मखरे सोशल मीडियाचे कार्य पाहणार आहेत. त्याचप्रमाणे विभागावर पदाधिकाऱ्यांची निवड यावेळी करण्यात आली.
निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी नियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, आजच्या तंत्रज्ञान युगामध्ये सोशल मिडीया चे कार्य मोठे असून आपले मत व्यक्त करण्याचे सोशल मीडिया महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे. सोशल मीडियाचा आपण सकारात्मक वापर केला पाहिजे. युवकांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप शहराध्यक्ष शकील भाई सय्यद यांनी केले.

Related Articles

Back to top button