इंदापूर

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलची कार्यकारणी जाहीर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते निवडीची पत्रे देण्यात आली

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलची कार्यकारणी जाहीर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते निवडीची पत्रे देण्यात आली

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.कार्यकारणीच्या तालुका अध्यक्षपदी सुनील मोहिते यांची निवड करण्यात आली. या निवडीची पत्रे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते देण्यात आली.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- डॉ.काशिनाथ सोलनकर (कार्याध्यक्ष) बाळासो गरगडे, दीपक निंबाळकर, आमीन मुल्ला (उपाध्यक्ष) जनार्दन शिंदे, बाळासाहेब भोंग (सरचिटणीस)संभाजी चांदणे (खजिनदार)प्रवीण लोंढे (मुख्याध्यापक प्रतिनिधी) किशोरी सातव (महिला प्रतिनिधी) पुंडलिक सोनवणे (क्रीडा शिक्षक प्रतिनिधी) यशवंत चव्हाण (शिक्षकेतर प्रतिनिधी) बापूराव बर्गे (विनाअनुदानित शाळा प्रतिनिधी) भारत शेंडगे (सोशल मीडिया प्रतिनिधी)श्रीराम सावंत (कला शिक्षक प्रतिनिधी),तानाजी शिंदे, संजय गायकवाड,महादेव हेगडे,प्रकाश पापत (कार्यकारणी सदस्य) तर सल्लागार म्हणून मुख्याध्यापक रामराव पाडुळे, सुभाष गायकवाड, पद्माकर लावंड यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहील तसेच त्यांनी नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी नूतन तालुकाध्यक्ष सुनील मोहिते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरोगामी विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही सर्वजण करणार आहोत.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक पद्माकर लावंड यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष अरुण थोरात यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button