इंदापूर

इंदापूर तालुक्याकरिता अर्थसंकल्पातून १६० कोटींचा निधी मंजूर

इंदापूर तालुक्याकरिता अर्थसंकल्पातून १६० कोटींचा निधी मंजूर

इंदापूर तालुक्याकरिता अर्थसंकल्पातून १६० कोटींचा निधी मंजूर

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

इंदापूर : प्रतिनिधी

नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात इंदापूर तालुक्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत १६० कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रविवारी (दि.२७) दिली.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गाच्या रस्त्यासह अन्य रस्त्यांची अनेक वर्षांपासून विकसित करण्याची मागणी प्रलंबित होती.सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांच्या दळणवळणासाठी महत्वाच्या रस्त्यांचे डांबरीकरण करून विकसित करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानुसार तालुक्यातील एकूण १२९ किलोमीटर लांबीचे रस्ते विकसित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

————————————————————-

मंजूर कामांची यादी खालीलप्रमाणे :-

पिठेवाडी-बावडा-भगतवाडी ते कचरेवाडी एकूण लांबी ८ किमी रक्कम ९ कोटी ५० लाख, नॅशनल हायवे ९ ते राऊतवाडी-गायकवाड वस्ती-पाटील वस्ती-बेंद वस्ती-माळवाडी ते इंदापूर रस्ता एकूण लांबी १४ किमी रक्कम १६ कोटी १५ लाख,गोंदी ते ओझरे, गिरवी ते क्षिरसागरवस्ती,पाटील वस्ती ठोकळे वस्ती रस्ता एकूण लांबी ११ किमी रक्कम १२ कोटी ३५ लाख, रा.म.मार्ग ९६५ ते झगडेवाडी,वडापुरी ते शेटफळ हवेली, नीरा भीमा कारखाना ते लाखेवाडी रस्ता एकूण लांबी १५ किमी रक्कम १७ कोटी १० लाख,इंदापूर – शिरसोडी रस्ता ते माळवाडी,ठाकुरवाडी पेटकरवस्ती,चिंदादेवी ते आजोती,टाकळी-पडस्थळ रस्ता एकूण लांबी १६ किमी एकूण रक्कम १८ कोटी ५ लाख,मत्स्यबीज केंद्र ते भांगेवस्ती, ननवरे वस्ती ते कांदलगाव,भास्कर पाटील वस्ती ते खामगळ वस्ती रस्ता एकूण लांबी १० किमी रक्कम ११ कोटी ४० लाख,पळसदेव मराडेवाडी ते कळस ते बोरी रस्ता एकूण लांबी ८ किमी रक्कम ७ कोटी ६० लाख,भवानीनगर कारखाना मागील बाजू ते सपकळवाडी,उदमाईवाडी-मानकरवा डी,मोरेवस्ती उद्धट ते पवारवाडी रस्ता एकूण लांबी १० किमी रक्कम ११ कोटी ४० लाख,अंथुर्णे ते शिरसटवाडी निमसाखर रस्ता एकूण लांबी १० किमी रक्कम १२ कोटी ३५ लाख,बंबाडवाडी-चव्हाणवाडी-परीटवाडी-सावंतवाडी ते फडतरे नॉलेज सिटी,कळंब ते रत्नपुरी रणगाव रस्ता एकूण लांबी १२.५०० किमी रक्कम ८ कोटी ५५ लाख,अंथुर्णे ते भरणेवाडी रस्ता काँक्रीटकरण करणे एकूण लांबी १.५ किमी रक्कम ३ कोटी ८० लाख,सणसर ३९ फाटा ते काझड,अकोले सीनारमास रस्ता एकूण लांबी १३ किमी रक्कम १५ कोटी.

तसेच इंदापूर तालुक्यातील बी.के.बि.एन रस्त्यावरील जांब निमसाखर-निरवांगी गावातील हद्दीतील लांबीत गटार बांधकाम करणे व गटारापर्यंत रुंदीकरण करणे रक्कम ६ कोटी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग इंदापूर अधिकारी कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम २ कोटी ६७ लाख, इंदापूर येथे ४ व्हिआयपी कक्ष बांधकाम ३ कोटी ५५ लाख,भिगवण येथे विश्रामगृह विस्तारित इमारत बांधकाम ३ कोटी १० लाख,सार्वजनिक बांधकाम उपविभाग भिगवण इमारत बांधकाम १ कोटी ५८ लाख इ.कामे मंजूर करण्यात आली आहेत.ही कामे तात्काळ सुरु करण्यात येतील अशी माहिती मंत्री भरणे यांनी दिली.

Related Articles

Back to top button