इंदापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी; काँग्रेसने केली मागणी
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली तहसीलदारांची भेट
इंदापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी; काँग्रेसने केली मागणी
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली तहसीलदारांची भेट
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्याला फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसला होता. सरकारने मदत घोषित केली व ती दिली देखील परंतु इंदापूर तालुक्यात अजून १७ हजार नागरिक मदतीपासून वंचित आहेत.त्यामुळे इंदापूर तालुका काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अनिल ठोंबरे यांची भेट घेत त्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
यावेळी बोलताना काँग्रेस तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत म्हणाले की, संबंधित अधिकार्याकडून मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील जवळपास ३४ हजार लोकांना शासनाची मदत आलेली आहे. त्यामध्ये १७ हजार नुकसानग्रस्तांच्या खात्यामध्ये दिवाळीत साधारणतः ९ कोटी रुपयांची मदत जमा झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात जानेवारी महिन्यात ९ कोटीची मदत आली आहे. परंतु काही त्रुटींमुळे ती अद्याप इतर नुकसानग्रस्तांच्या खात्यावर जमा झाली नाही. यामध्ये एकूण ५६ गावांचा व जवळपास १७ हजार लोकांचा समावेश आहे. तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा झाल्यानंतर येत्या १५ दिवसात उरलेले रक्कम नुकसानग्रस्तांच्या खात्यावर जमा होईल असे सावंत यांनी सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांसह कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर , जिल्हा सरचिटणीस जकिरभाई काझी, शहरध्यक्ष चमनभाई बागवान, भगवान पासगे, निवास शेळके, प्रदीप शिंदे , राहुल वीर , महादेव लोखंडे, युवक जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास पाटील , मिलिंद साबळे , डॉ.संतोष होगले , विकास बनकर आदी उपस्तिथ होते.