इंदापूर तालुक्यातील अवसरी – भाटनिमगांवच्या शेतक-यांचे बोंबाबोंब आंदोलन
शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा दिला इशारा.
इंदापूर तालुक्यातील अवसरी – भाटनिमगांवच्या शेतक-यांचे बोंबाबोंब आंदोलन
शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा दिला इशारा.
इंदापूर:- बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील भाटनिमगांव व अवसरी मधील 119 शेतक-यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले.शासनाकडून सदर पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश आले खरे पण अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा फटका शेकडो शेतक-यांना बसला आहे.
ऑगस्ट 2019 मध्ये अतिवृष्टी झाली आणी इंदापूर तालुक्यातील हजारो एकर क्षेत्र उध्वस्त झाले.यात भाटनिमगांव मधील 96 शेतकरी व अवसरी मधील 23 शेतक-यांचा समावेश आहे. महसूल खात्याकडून पंचनामा झाला खरा मात्र गाव कामगार तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या ताळमेळ नसल्याने तो शासन दरबारी दाखलचं झाला नाही.शासन दरबारी पंचानामा दाखल नसतानाही 119 शेतक-यांपैकी 34 शेतक-यांना चिरीमीरी घेऊन शासनाचा लाभ देण्यात आला असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.भाटनिमगांव-अवसरी मधील लाभापासून वंचीत राहीलेल शेतकरी भडकले असून दि.30 रोजी कोरोनाच्या सावटातही अवसरी तलाठी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन चालू केले असून चिरीमिरी घेऊन शेतक-यांच्या टाळू वरचे लोणी खाणा-या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर ताडीने कारवाई करुन न्याय द्या अन्यथा सामूहीक आत्मदहन करुन असा थेट इशारा या भडलेल्या बळीराजाने दिला आहे. या संदर्भातील लेखी निवेदन मंडल अधिकारी एन.एस.गायकवाड यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि २०१९ साली ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे भाटनिमगाव व अवसरी या गावातील अनेक शेतक-याच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते व आर्थिक संकट निर्माण झालेले होते. म्हणून शासनाने सदर पिकांची पाहणी करून पंचनामे करून सर्व बाधित शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मा. तलाठी कृषी सेवक व ग्रामसेवक यांना पाहणी करून पंचनामा करण्याचा आदेश दिला होता.दोन्हीही गावातील एकूण ९६ शेतक-यांच्या पिकांची पाहणी व पंचनामा करून अहवाल शासणास सादर करणे. आवश्यक असताना, फक्त ज्यांनी ज्यांनी तलाठी अजित पाटील, कृषी सेवक अपर्णा देवकर व ग्रामसेवक खरमाटे भाऊसाहेब यांना “आर्थिक मलिदा” दिला आशा फक्त २८ लोकांनाच सदर निधी मिळाला असून बाकी ६८ लोकांना सदर निधी मिळालेला नाही. या प्रकरणाची तक्रार आम्ही प्रत्यक्ष तहसीलदार सोनाली मेटकरी यांना आम्ही दिलेली होती. परंतु त्यांनी हि आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली.
तलाठी व कृषी सहाय्यक व ग्रामसेवक हे एकमेकाकडे बोट दाखवून जबाबदारी टाळत आहेत. या तीघांच्या बेजबाबदारपणामुळे दोन्हीही गावातील शेतक-यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यास वरील तीघे व प्रशासन जबाबदार आहे. तरी वरील सर्व अधिकारी व प्रशासनातील सर्व अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व आम्हाला आमचा पूर निधी देण्यात यावा अशी मागणी या शेतक-यांनी केली आहे.