इंदापूर तालुक्यातील कळस – काझड वनालगत चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करून पळून जात असताना दोन आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात… गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांकडून ही कारवाई…
गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांकडून ही कारवाई... एक बंदूक, सहा जिवंत काडतुसे व सर्च लाईट सह मोटार सायकल मुद्देमाल ताब्यात... दोन आरोपीवर वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल..

इंदापूर तालुक्यातील कळस – काझड वनालगत चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करून पळून जात असताना दोन आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात…
गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांकडून ही कारवाई… एक बंदूक, सहा जिवंत काडतुसे व सर्च लाईट सह मोटार सायकल मुद्देमाल ताब्यात… दोन आरोपीवर वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल..
कळस :बारामती वार्तापत्र रिपोर्ट
चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करणाऱ्या दोघांना पुणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. महेश जंगलु मने (वय 40, रा. सणसर, इंदापूर, पुणे) आणि दत्तात्रय पोपट पवार (वय 42, रा. बोरी, इंदापूर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून 9 बोरची रायफल, 6 जिवंत काडतुसे आणि 1 वापरलेले काडतूस जप्त करण्यात आले आहे.
इंदापूर वनपरिक्षेत्रातील कळस, काझड, शिवेवर वनविभागाचे कर्मचारी मंगळवारी रात्री गस्त घालत असताना त्यांना जंगलातून बॅटरीचा प्रकाश दिसला. यानंतर कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी जंगलात पाठलाग करून वरील दोघा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ असलेल्या एका बोरीमध्ये रक्ताने माखलेले चिंकारा जातीचे हरीण मृतावस्थेत सापडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हरणाची शिकार केल्याचे सांगितले.
इंदापूर तालुक्यातील वन्य प्राण्यांची शिकार होत असल्याची या महिन्यातील ही दुसरी घटना उघडकीस आली आहे. 1 मे च्या रात्री खोकड प्राण्याची शिकार केल्याच्या आरोपाखाली कुंभारगाव येथील दोन आरोपी ताब्यात घेतले होते. यानंतर आज रात्रीचा घटनेने तालुक्यातील वन्य प्राणी असुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.
वनगुन्हा करणार्यांची गय केली जाणार नाही. आम्ही रात्रीची गस्त वाढवली आहे. खबर्यांची संख्या वाढवली आहे. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांनी शिकार केलेल्या हरणाचे मांस कुठे विक्री करणार होते याचा तपास करून अन्य काही आरोपी हाती लागण्याची शक्यता असल्याचे तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी सांगितले.