इंदापूर तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या हाती भोपळा ;तर काही ठिकाणी एका जागेवर समाधान
अनेक ग्रामपंचायतीमध्ये भाजपाची एकहाती सत्ता
इंदापूर तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या हाती भोपळा ;तर काही ठिकाणी एका जागेवर समाधान
अनेक ग्रामपंचायतीमध्ये भाजपाची एकहाती सत्ता
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज (दि.१८) रोजी लागला.काही ग्रामपंचायतीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पळताभूई थोडी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले असून अनेक ग्रामपंचायती मध्ये खातेही उघडता आले नाही.तर काही ठिकाणी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
या ५७ ग्रामपंचायतीसाठीच्या काही ठिकाणचे निकाल पाहिले तर वरकुटे खुर्द,गलांडवाडी नं.१ ,बाभूळगाव,नीरा-नरसिंहपूर,भावडी या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हाती अक्षरशः भोपळा लागला असून भिगवण व पिठेवाडी या ठिकाणी फक्त एक जागा हाती आली आहे.सदरील ग्रामपंचायतीमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना चितपट केल्याचे पाहवयास मिळाले आहे.
त्यामुळे येऊ घातलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका आणि इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक रंगतदार होणार हे तितकेच खरे आहे.