इंदापूर तालुक्यातील कोरोना परिस्थिती गंभीर;एकाच दिवसात 16 नवे रुग्ण.
उपचारादरम्यान भिगवण येथील एका जणाचा मृत्यू.
इंदापूर तालुक्यातील कोरोना परिस्थिती गंभीर;एकाच दिवसात 16 नवे रुग्ण.
उपचारादरम्यान भिगवण येथील एका जणाचा मृत्यू.
इंदापूर:-प्रतिनिधी
दि.30 जुलै रोजी इंदापूर तालुक्यातील तब्बल सोळा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत,तर भिगवण येथील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तत्पूर्वी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कातील 11 अहवाल दुपारी आले होते त्यापैकी 5 पॉझिटिव्ह तर 6 निगेटिव्ह आले होते. यानंतर रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार आणखी 11 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.असे मिळून आज दिवसभरात एकूण 16 जणांना कोरोनाची लागणं झाली आहे.यामध्ये
निमगाव केतकी 3 , कळाशी 1 ,
भिगवण 1 , कुरवली 1 ,राऊतवस्ती 1 , माळवाडी 1 , आणि सणसर येथील एकाच कुटुंबातील 8 अशा एकूण सोळा नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाल्याने तालुक्यातील आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या 181 वर जाऊन पोहचली आहे.
दिवसेंदिवस वाढणारी रुग्ण संख्या बघता नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे तंतोतंत पालन करणे खूप गरजेचे आहे.