इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी उपकेंद्रात दोन दिवसांमध्ये ३३९ नागरिकांचे लसीकरण
प्रांताधिकार्यांनी भेट देऊन केली पाहणी

इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी उपकेंद्रात दोन दिवसांमध्ये ३३९ नागरिकांचे लसीकरण
प्रांताधिकार्यांनी भेट देऊन केली पाहणी
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील मौजे तक्रारवाडी येथील आरोग्य उपकेंद्रात ( दि. ०५ ) रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात झाली. या दोन दिवसांमध्ये ३३९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मृदुला जगताप यांनी दिली.या ठिकाणी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली.
येथील आरोग्य उपकेंद्रातील लसीकरण मोहिमेचे उद्घाटन इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गावडे, विस्तार अधिकारी दिलीप जगताप, रोटरी क्लबचे अध्यक्ष संपत बंडगर, तक्रारवाडीचे सरपंच सतीश वाघ, मदनवाडीचे उपसरपंच तेजस देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य सेवक शरद ससाने, उषा यादव यांसह तक्रारवाडी, मदनवाडी, पोंधवडी या गावचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.