इंदापूर

इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना ; मुलाने केला बापाचा डोक्यात दगड घालून खून

भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना ; मुलाने केला बापाचा डोक्यात दगड घालून खून

भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

इंदापूर : प्रतिनिधी

बापाच्या त्रासाला कंटाळून मुलाने बापाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील मौजे मदनवाडी येथे बुधवारी (दि.२३) घडली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी (दि.२३) सकाळी सव्वा आठच्या सुमारास राजेंद्र छगन कुंभार ( रा.मदनवाडी. ता.इंदापूर ) याने भिगवण पोलिस ठाण्यात येऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने माझे वडील छगन गजानन कुंभार यांच्या डोक्यात दगड घालून खून केला आहे अशी माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बारकाईने पाहणी केली व खबर देणारा मुलगा राजेंद्र छगन कुंभार याची सखोल चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच पोलिसांची दिशाभूल करीत होता. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने वडील दारू पिऊन रोज शिवीगाळ करून रात्र-रात्र घराच्या बाहेर काढून दिलेल्या त्रासाला कंटाळून वडील झोपेत असताना रात्री दोनच्या सुमारास डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करून त्यांचा खून केल्याची कबुली दिली.याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील, रुपेश कदम, सुभाष रुपनवर, पोलीस अंमलदार नाना वीर, समीर करे, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, आप्पा भांडवलकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button