इंदापूर

इंदापूर तालुक्यातील नरुटवाडीत विजेची तार तुटून सव्वा एकर ऊस जळून खाक.

जवळपास 70 टन उस जळाला.

इंदापूर तालुक्यातील नरुटवाडीत विजेची तार तुटून सव्वा एकर ऊस जळून खाक.

जवळपास 70 टन ऊस जळाला.

 इंदापूर:-प्रतिनिधी

विजेची तार तुटून आग लागल्याने शेतातील सव्वा एकर  हून अधिक ऊस जळून खाक झाल्याची घटना इंदापूर तालुक्यातील नरुटवाडी येथे घडली आहे.

नरुटवाडी येथील शेतकरी भीमाशंकर विलास जाधव यांच्या  गट नंबर १९/२ मधील  शेतातील ऊस पिकावर विजेच्या खांबावरील तार अचानक पडून सव्वा एकराहून अधिक ऊस या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

यामध्ये जाधव यांच्या शेतातील ऊस तसेच पाईप व इतर शेतीचे साहित्य जळून खाक झाले.

जाधव यांचा अंदाजे 70 टन ऊस जळीत होवून अतोनात नुकसान झाले आहे .सध्या साखर कारखाने चालू नसल्याने हा जळीत झालेला ऊस पाठवायचा कुठे आणि त्याचे करायचे काय असा मोठा प्रश्न जाधव यांच्यापुढे उभा टाकला आहे.

दरम्यान गावचे गाव कामगार तलाठी सचिन करगळ , तसेच वीज महामंडळाचे अभियंता दवर,  वायरमन चोपडे कृषी विभागाचे कृषी सहाय्यक प्रशांत मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला . यामध्ये अंदाजे 70 टन उस  जळीत झाल्याचे व   1 लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वीज महामंडळाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भीमाशंकर जाधव यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button