इंदापूर तालुक्यातील नादुरूस्त रस्त्याबाबत काँग्रेस आक्रमक;रस्ते त्वरित दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा
संबंधित अधिकाऱ्यांना दिले निवेदन.
इंदापूर तालुक्यातील नादुरूस्त रस्त्याबाबत काँग्रेस आक्रमक;रस्ते त्वरित दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा
संबंधित अधिकाऱ्यांना दिले निवेदन.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
इंदापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामांमुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची जणू काय चाळणच झाली आहे. अनेक मार्गांवर मोठमोठे खड्डे पडले असल्याने नागरिकांना तसेच वाहनचालकांना दळणवळण करण्यास खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असून यामुळे अनेक अपघातही होत आहेत. त्यामुळे इंदापूर तालुका काँग्रेस रस्ते दुरुस्त करण्याच्या मागणी संदर्भात आक्रमक झाली असून आज (दि. 4 )रोजी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन रस्ते त्वरित दुरुस्त करावे अशी मागणी करत लेखी निवेदन दिले व संबंधित प्रत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिली आहे.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत, इंदापूर शहराध्यक्ष तानाजी भोंग, इंदापूर तालुका उपाध्यक्ष बिभीषण लोखंडे,तालुका काँग्रेस सरचिटणीस निवास शेळके, खजिनदार भगवान पासगे, तालुका काँग्रेस सरचिटणीस संतोष शेंडे,युवक सरचिटणीस अरुण राऊत,तालुका युवक सरचिटणीस मिलिंद साबळे, सुरेश लोखंडे आदी उपस्थित होते.
दरम्यान रस्ते त्वरित दुरुस्त न झाल्यास आगामी काळात काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा तालुका काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.