इंदापूर

इंदापूर तालुक्यातील पुल व रस्त्यांसाठी २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली माहिती

इंदापूर तालुक्यातील पुल व रस्त्यांसाठी २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली माहिती

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील पुल व रस्त्यांसाठी २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.ते म्हणाले की,तालुक्यातील निरनिमगाव गावातील नीरा नदीवरील पुला करिता १३ कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.बावडा,पिठेवाडी, भगतवाडी,कचरवाडी ते पुणे जिल्हा हद्दमार्ग या १३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी नाबार्ड टप्पा क्र.२७ अंतर्गत ७ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा, दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत जवळचा व सोयीस्कर मार्ग म्हणून या रस्त्यावरील पुलाचे महत्त्व आहे.त्यामुळे इंदापूर,बावडा, निरनिमगाव नदीवरील पूल ते माळशिरस म्हसवड हा मार्ग जोडला जाणार आहे. सुमारे वीस किलोमीटर अंतर कमी होणार आहे,असे ते म्हणाले.

नव्याने प्रस्तावित फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग होत असलेल्या माळशिरस तालुक्यातील घाणीचुना येथे रेल्वे स्टेशन होणार आहे.हे रेल्वे स्टेशन निरनिमगाव नदीवर पूल झाल्यास फक्त दोन किलोमीटर अंतरावर असणार आहे.हा मार्ग व पूल पूर्ण झाल्यास इंदापूर,म्हसवड,सांगली, कोल्हापूरकडे जाणे सर्वात सोयीचे असणार आहे,असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी ऊस वाहतूक,अंतर कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणार आहे.इंदापूर तालुक्यातील भिगवण रेल्वे स्टेशन प्रमाणे माळशिरस तालुक्‍यातील रेल्वे स्टेशन इंदापूर तालुक्याच्या अत्यंत जवळचे रेल्वे स्टेशन असणार आहे. एमआयडीसी अथवा साखर कारखान्यातील मालाची वाहतूक जवळची होण्यास मदत होणार आहे असा विश्वास राज्यमंत्री भरणे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button