इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गरजू-निराधारांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लाभ मिळवून देणार – महादेव लोंढे
शिरसोडीत फॉर्म वाटपाचा कार्यक्रम संपन्न

इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गरजू-निराधारांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लाभ मिळवून देणार – महादेव लोंढे
शिरसोडीत फॉर्म वाटपाचा कार्यक्रम संपन्न
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गरजू,निराधार व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळवून देणार अशी ग्वाही इंदापूर तालुका कॉंग्रेसचे सचिव तथा संजय गांधी निराधार समिती सदस्य महादेव लोंढे यांनी दिली.
१ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्तानं इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शिरसोडी येथे संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात जनजागृती,मार्गदर्शन व मोफत फॉर्म चे वाटप करण्याचा कार्यक्रम पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार संजय जगताप व तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या मार्गदार्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
सदरील कार्यक्रमासाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संतोष खामकर, डॉ.अनिरुद्ध गार्डे,डॉ.सोमनाथ खाडे,तलाठी श्री.मुळे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर तालुका काँग्रेसचे शिवाजीराव आहेर,मुरलीधर पोळ,मच्छिंद्र शिंदे, काशिनाथ शिंदे, बंडू चोरमले, सहदेव शिंदे,सीताबाई आहेर, नाजिमा डांगे, झुंबर शिंदे, कुसुम जाधव यांनी केले.आभार किसन काँग्रेस सेल चे तालुकाध्यक्ष डॉ. संतोष होगले यांनी मानले.