इंदापूर

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे अनोखे मच्छी विक्री केंद्र…

महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम...

स्पेशल वृतांत…,

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे अनोखे मच्छी विक्री केंद्र…

महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम…

इंदापूर :- सिद्धार्थ मखरे (तालुका प्रतिनिधी)

प्रथिनेयुक्त आहार म्हणून जगात मासे खाणे हा प्रमुख अन्नघटक मानला जातो. विविध गुणधर्मामुळे मासे आपले आरोग्य निरोगी ठेवते. सर्वात पौष्टीक व चवदार आणि पचनाला हलके असणारे मासे बहू आजारांवरही रामबाण उपाय आहे. मग असे मासे जिवंत मिळाले तर? अशक्य वाटते ना..! परंतू हे शक्य करुन दाखविले आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे.., भिगवण येथे राज्यातील पहिला व अनोखे जिवंत मासे विक्री केंद्र सुरु करण्यात आला आहे..

नको बर्फ, नको साठा… जिवंतच करा वजन काटा…

भिगवण मध्ये अनोख्या पद्धतीने जिवंत मासे विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे राज्यातील असा हा पहिलाच प्रयोग आहे, ज्या ग्राहकांना मासे खरेदी करायचे आहेत त्यांनी थेट या मत्स्य केंद्रात जाऊन त्याठिकाणी असलेल्या मत्स्य तळ्यातील मासे स्वतः पकडायचे आहेत यासाठी तशी खास व्यवस्थाही करण्यात आलेली आहे, त्यामुळे मत्स्य ग्राहकांना त्यांच्या आवडीचे व जिवंत मासे मिळणार आहेत..


जिवंत मासे विक्रीस ठेवणे अतिशय जिकरीचे काम आहे.मात्र ही जोखीम उचलण्याचे धाडस करण्यात आले आहे.बर्फातील व साठा केलेले मासे कितीही मिळू शकतात मात्र जिवंत मासे साठवणूक करणे किंवा ते मिळवणे फार अवघड बाब आहे मात्र ग्राहकांना वेगळा,अनोखा अनुभव देण्यासाठी ही जोखीम उचलली आहे.
या आगळ्या वेगळ्या प्रकल्पाची संकल्पना भरत मल्लाव व ऍड पांडुरंग जगताप यांनी तयार करून प्रत्यक्षात अंमलात आणली आहे.

पत्रकार भरत मल्लाव व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही वर्षापूर्वी भिगवण येथे मत्स्य बीज केंद्र उभा केला आहे, या मत्स्य बीज केंद्रातून सध्या कोट्यावधी मत्स्यबीज त्यांची विक्री होत आहे तर अनेक तलावात मोठ्या प्रमाणात जिवंत रोह, कटला, सायप्रनीस, चिलापी आदि माशांव्यतिरिक्त इतरही जातींचे मासे आहेत, हेच जिवंत मासे त्यांनी रस्त्यालगत असणार्‍या एका छोट्याश्या आकर्षक अशा टँक मध्ये सोडले आहे ज्या ग्राहकाला ज्या प्रकारच्या जातीचे मासे हवे आहेत तसे जिवंत मासे स्वतः ग्राहक दिलेल्या हॅन्ड नेट च्या साह्याने पकडतात व शेजारी त्याचे वजन करून कटिंग करून स्वच्छ करून एका आकर्षक बॉक्‍समध्ये पॅकिंग करून ते ग्राहकांना दिले जाते त्यामुळे जिवंत मासे पकडण्याचा आनंदी ग्राहकाला मिळत आहे.अशा जिवंत मासे विक्री केंद्रावर सध्या जिवंत रोह, कटला, सायप्रनीस, चिलापी आदि माशांव्यतिरिक्त इतरही जातींचे गोडया व समुद्रातील ताजे मासे मिळत आहेत, त्यामुळे मासे खवय्यांना आता मासे खाण्यास सोबत मासे पकडण्याचा ही आनंद मिळत आहे…

Related Articles

Back to top button