इंदापूर

इंदापूर तालुक्यातील सततच्या वन विभागाच्या कारवाईचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी प्रयत्न करणार – संजय सोनवणे

वन विभागाच्या कारवाईमुळे विष प्राशन केलेल्या महिलेची घेतली भेट

इंदापूर तालुक्यातील सततच्या वन विभागाच्या कारवाईचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी प्रयत्न करणार – संजय सोनवणे

वन विभागाच्या कारवाईमुळे विष प्राशन केलेल्या महिलेची घेतली भेट

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर :प्रतिनिधी
वनविभागाने मौजे आजोती येथील सुमन ज्ञानदेव गुटाळ यांचे उभे ऊस क्षेत्र उद्ध्वस्त केल्याने त्यांनी या त्रासाला कंटाळून विष प्राशन केले. त्यांच्यावर इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू असून पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे युवा आघाडीचे नेते संजय सोनवणे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची शनिवारी भेट घेतली. व वनविभागाच्या सततच्या कारवाईचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सोनवणे म्हणाले की,गेल्या काही वर्षांपासून वन विभागाकडून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अशाच पद्धतीची वागणूक मिळत आहे.त्यामुळे दोन वर्षांपूर्वी इंदापूर नगरपरिषदेपासून तहसील कचेरी पर्यंत पीआरपी च्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता.त्यावेळी या विषयाच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांची मिटिंग झाली होती. परंतु अजूनही हा विषय मार्गी लागला नाही.

त्यामुळे आत्ता हा विषयी विद्यमान वनराज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा करून कायमचा सोडणार असल्याचे संजय सोनवणे यांनी बारामती वार्तापत्रशी बोलताना सांगितले.

Related Articles

Back to top button