इंदापूर

इंदापूर तालुक्यातील ८ ग्रामपंचायत कार्यालये व ३३ अंगणवाडी इमारती करीता ४ कोटी ९१ लाख मंजूर

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

इंदापूर तालुक्यातील ८ ग्रामपंचायत कार्यालये व ३३ अंगणवाडी इमारती करीता ४ कोटी ९१ लाख मंजूर

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील ८ ग्रामपंचायत कार्यालये व ३३ अंगणवाडी इमारती करीता ४ कोटी ९१ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी (दि.११) दिली.

इंदापूर तालुक्यातील अजोती, लुमेवाडी, सुरवड, कालठण नं.१, भोंडणी, व्याहाळी, तरटगाव व खोरोची या गावात नविन ग्रामपंचायत कार्यालय बांधण्याकरिता प्रत्येकी १५ लाख असा एकूण १ कोटी २० लाख निधीला जिल्हा परिषद स्वनिधी सन २०२२ – २३ स्व. आर. आर. (आबा) पाटील ग्रामसचिवालय बांधणे या योजनेअंतर्गत मंजूरी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर चाकाटी, वडापूरी पवारवस्ती, भाटनिमगाव गावठाण, वरकुटे व चितळकरवाडी, रेडणी कदमवस्ती, कालठण नं. २, गलांडवाडी नं. १ जाधववस्ती, सराटी, गोंदी ओझरे, हगारेवाडी, हनुमानवाडी, भोडणी भोंगळेवस्ती, बावडा, कडबनवाडी, काटी शेळके राऊत वस्ती, गंगावळण, लाखेवाडी थोरवेवस्ती, शेटफळहवेली, वडापूरी हनुमानवाडी, बेलवाडी, लासुर्णे,लासुर्णे निंबाळकर मळा, लासुर्णे ४, लासुर्णे वैदवादी, जांब, म्हसोबाचीवाडी, शेटफळगढे, लामजेवाडी, सणसर, तावशी, भिगवण स्टेशन अलीकडे, भिगवण स्टेशन पलीकडे, निमसाखर जाधवमळा, लाकडी, निंबोडी अशा नविन ३३ अंगणवाडी बांधकामांकरीता जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन २०२२ – २३ अंतर्गत प्रत्येकी ११ लाख २५ हजार रुपये प्रमाणे ३ कोटी ७१ लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram